Homemade serum for wrinkle free skin: उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. या ऋतूत उन्हामुळे आणि मातीमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. त्वचेवर मुरुम, पिंपल्स वगैरे होऊ लागतात. इतकंच नाही तर यामुळे त्वचाही निस्तेज दिसते, उन्हाळ्याच्या ऋतूत चेहऱ्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.चांगली आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी टोनिंग, मॉइस्चरायझिंग करणे अत्यंत महत्वाचे आहे. चेहऱ्यावर सीरम लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. फेस सीरम आपल्या त्वचेला पोषण देणाऱ्या घटकांचा वापर करून तयार केले जाते. या घटकांमध्ये पोषक असतात जे आपली त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवतात. बाजारात उपलब्ध असलेले अनेक फेस सीरम हानिकारक रसायनांनी तयार केले जातात. अशा परिस्थितीत, तुम्ही हे सिरम बाहेरुन विकत घेण्यापेक्षा घरीच बनवू शकता. होममेड सीरम तुमच्या त्वचेला केवळ नैसर्गिक पोषणच देत नाही तर कोणत्याही एलर्जीशिवाय तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनवेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे सीरम बनवा

घरी सीरम बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा एलोवेरा जेल, अर्धा चमचा व्हिटॅमिन ई तेल आणि दोन थेंब लॅव्हेंडर तेल मिसळा आणि एका स्वच्छ डब्यात भरा. आता हे सीरम त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करेल.सिरमच्या रोजच्या वापराने तुम्हाला तुमच्या त्वचेत सकारात्मक बदल दिसतील

सीरमचे फायदे

सीरम चेहऱ्यावर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी चेहऱ्यावरील उघडे छिद्र कमी करते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करते. सीरम त्वचेवरील डाग कमी करण्यासही मदत करते.सीरमच्या मदतीने तुम्ही तुमची त्वचा उजळ करू शकता. सीरम हे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

हेही वाचा >> Banana Peel For Skin: तुम्ही फेकत असलेली केळीची सालही आहे फायद्याची; चेहरा करेल झटक्यात चमकदार

या गोष्टी लक्षात ठेवा

जेव्हा तुम्ही घरी सीरम बनवता तेव्हा लक्षात ठेवा की सीरममध्ये वापरलेले सर्व घटक ताजे असावेत. याशिवाय, सीरम हवाबंद आणि स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा, सीरम चेहऱ्यावर घासू नका आणि हलक्या हाताने लावा.

सीरम लावण्यापूर्वी त्याचा एक पॅच टेस्ट करा. सीरम वापरण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा, सीरम रात्री वापरणे चांगले होईल. काही लोकांना सीरमची ऍलर्जी असू शकते, जर असे होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homemade serum for glowing and beautiful face know making process skin care in summer srk