Honor चा नवा स्मार्टफोन Honor 8X ची भारतात विक्री सुरू झाली आहे. अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याच महिन्यात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता.

भारतामध्ये हा स्मार्टफोन तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असणार आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज, 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज हे तीन व्हेरिअंट्स आहेत. अनुक्रमे 14 हजार 999 रुपये, 16 हजार 999 रुपये आणि 18 हजार 999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. ब्लॅक, रेड आणि ब्ल्यू या रंगांमध्ये फोन उपलब्ध असेल.

स्मार्टफोनच्या मागील बाजूला प्रीमियम ग्लास फिनिशिंग देण्यात आली असून, पुढील बाजूला नॉच डिस्प्ले आहे. अॅन्ड्रॉइड ओरिओच्या धर्तीवर EMUI 8.2.0 वर हा स्मार्टफोन कार्यरत असेल, तसंच यामध्ये ड्युअल-सिम स्लॉट (नॅनो+नॅनो-मायक्रो एसडी) आहे. 6.5-इंच फुल एचडी डिस्प्ले फोनमध्ये आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये रिअर ड्युअल कॅमेरा सेटअप असून, याचा मुख्य कॅमेरा 20 मेगापिक्सल आणि द्वितीय कॅमेरा दोन मेगापिक्सलचा आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 3,750mAh ची बॅटरी फोनमध्ये आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, ड्युअल-बँड वाय-फाय, मायक्रो युएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅकचा सपोर्ट आहे. तसंच चांगल्या पर्फोमन्ससाठी यामध्ये GPU टर्बो टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे.