एकामागोमाग लागून सुट्या आल्या किंवा एखादा सण जवळ येत असल्यास आपण घरातील लहान-मोठ्या गोष्टींची साफसफाई करायला सुरुवात करतो. त्यामध्ये मग कपड्यांच्या कपाटापासून ते पंखे झाडणे, स्वयंपाकघरातील सफाई किंवा टॉयलेट-बाथरूम चकाचक करणे अशा कितीतरी गोष्टी निघत जातात. मात्र, त्यामध्ये एक वस्तू अशी आहे; जी आपण कितीही स्वच्छ केली तरी ती एका दिवसात खराब होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या घरातील दररोज आणि सतत वापरली जाणारी ती गोष्ट म्हणजे पाण्याचे नळ. बाथरूम, टॉयलेट किंवा बेसिन असू दे; सतत हात धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी वगैरे त्यांचा वापर केला जातो. आपले हात-पाय स्वच्छ करणारी वस्तू स्वतः मात्र न धुतलेली किंवा पाण्याचे शिंतोडे उडून घाण होते. त्यावर डाग पडतात. बेसिनमध्ये भांडी घासताना साबण म्हणा किंवा अजून काही लहान-लहान गोष्टी लागून तो खराब होत असतो. अशा वेळेस त्याला पुन्हा नव्यासारखे चकचकीत कसे बनवावे?

हेही वाचा : Kitchen tips : भात गिचगिचीत किंवा खूप मोकळा होतोय? ‘ही’ असू शकतात त्याची कारणं; या पाच उपयुक्त टिप्स पाहा…

असा प्रश्न घरात साफसफाई करताना प्रत्येकाला पडू शकतो. मात्र, त्यासाठी एक भन्नाट आणि स्वस्तात मस्त ट्रिक इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @momsgupshup777 या अकाउंटवरून शेअर केली आहे. आपण अनेकदा घरात सोडा असलेले शीतपेय आणत असतो. त्यापासूनच नळ चमकवण्याचा जुगाड व्हिडीओमधून दाखवलेला आहे. आता या शीतपेयाचा वापर नळ स्वच्छ करण्यासाठी कसा करावा ते पाहा.

या व्हिडीओनुसार सोडा असलेली शीतपेय नळावर ओतावे. ते १० मिनिटांसाठी तसेच ठेवून, नंतर ब्रश किंवा भांडी घासायच्या मऊ स्पंजने नळ घासून घ्यावा. आता तो नळ टिश्यू पेपरच्या मदतीने व्यवस्थित पुसून घ्या. डाग लागलेला आणि खराब झालेला नळ अगदी पुन्हा नव्यासारखा दिसत असल्याचे या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो.

तुम्हीही जर घराची साफसफाई करीत असाल, तर हा प्रयोग करून पाहू शकता. इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत आठ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House cleaning tips remove all stains from bathroom and sink taps with soft drink check out this hack dha
First published on: 27-01-2024 at 17:59 IST