घरचे अन्न स्थूलपणा कमी करण्यास उपयोगी

जेवताना एका ठिकाणी बसून शांत चित्ताने अन्न ग्रहण करावे, असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते.

obesity
स्थूलपणा

घरी शिजवलेले अन्न ग्रहण करणे आणि जेवताना टीव्ही बघणे टाळणे यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. यासंबंधी अमेरिकेतील ओहायो स्टेट युव्हिर्सिटीतील रॅशेल टय़ुमिन यांनी केलेले संशोधन जर्नल ऑफ द अ‍ॅकॅडेमी ऑफ न्यूट्रिशन अँड डाएटेटिक्स या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

जेवताना एका ठिकाणी बसून शांत चित्ताने अन्न ग्रहण करावे, असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो असे मानले जाते. त्याचे शास्त्रीय महत्त्व आता सिद्ध झाले आहे. या विषयावर संशोधन करताना शास्त्रज्ञांनी अमेरिकेतील १२,८४२ नागरिकांची पाहणी केली. त्यात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. तसेच लठ्ठपणाची व्याख्या करताना ज्यांचा बॉडी-मास इंडेक्स ३०पेक्षा जास्त आहे त्यांना लठ्ठ मानायचे असा निकष ठरवण्यात आला. अभ्यासात असे दिसून आले की ज्या व्यक्ती शक्यतो घरी शिजवलेले अन्न खातात त्यांच्यामध्ये स्थूलपणाची कमी लक्षणे होती. ज्या व्यक्ती बाहेरचे खाणे खातात त्यांच्यात लठ्ठपणा अधिक होता. तसेच जे लोक जेवताना सारखे उठतात आणि टीव्ही बघतात त्यांच्यात लठ्ठपणा अधिक होता. आणि जे जेवताना टीव्ही बघत नाहीत त्यांच्यात स्थूलपणा कमी होता. संशोधकांपैकी सारा अँडरसन यांनी म्हटले की घरी जेवण्याचे प्रमाण जरी विचारात घेतले नाही तरी जे जेवताना टीव्ही बघत नाहीत त्यांच्यात स्थूलपणाचे प्रमाण कमी असलेले आढळले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: House food useful to reduce obesity