How Construction Worker Builds Muscle : हेल्दी राहणे, फिट राहणे म्हणजे योग्य डाएट, सप्लिमेंट्स, प्रोटीन शेक, व्यायाम, योग्य आहार, जिम, असेच आपण मानतो. पण, चेन्नई येथील एक बांधकाम कामगाराने स्वतःचे नवीन नियम तयार केले आहेत. ‘इन्फ्लुएन्सर’ जयचंद्रन तमिळरासन यांनी शेअर केलेली त्यांची ही गोष्ट अनोखी आणि मनाला भावणारी आहे. कोणतीही सप्लिमेंट्स नाहीत. कोणतेही स्टिरॉइड्स नाहीत. फक्त साधे जेवण, काम आणि व्यायाम.

ट्रेंड्सवर नव्हे, सातत्यावर आधारित दिनचर्या

त्यांची वर्कआऊट करण्याची पद्धत क्लासिक ‘ब्रो स्प्लिट’ पद्धतीची आहे, ज्यावर अनेक फिटनेप्रेमी विश्वास ठेवतात; पण अनेकदा अर्धवटसुद्धा सोडून जातात. म्हणजे कामगार प्रत्येक दिवस एका विशिष्ट स्नायूसाठी समर्पित करतो. सोमवारी छाती, मंगळवारी खांदे, आठवड्याच्या मध्यात पाठ, दुसऱ्या दिवशी हात आणि शुक्रवारी पाय. कामगार पायांचे (leg) व्यायाम थोडे हलके आणि कमी तीव्रतेने करतो. त्यामुळे त्याची रूटीन अधिकच प्रामाणिक वाटते.

जसे त्याचे वर्कआउट्स सोपे असतात, त्याचा आहार त्याहूनही अधिक सोपा असतो. दिवसातून तीन वेळा जेवणात पांढरा भात, त्याबरोबर सांबार, रसम आणि रोजच्या भाज्यांची आमटी असते. प्रथिनांसाठी अधूनमधून अंडी आणि मटण खातो. आहारात चिकन, मासे, पॅकेज केलेले अन्न अजिबात नसते. तो फळेदेखील अगदीच कमी खातो. बहुतेकदा लाल केळीचे सेवन करतो.

आहार, काम आणि व्यायामशाळा

त्याची शरीररचना आहार, काम व व्यायामशाळा यांमुळे तयार झाली आहे. तो कोणतेही स्टिरॉइड्स किंवा प्रोटीनवर अवलंबून राहत नाही, मद्यपान, धूम्रपान करीत नाही. दररोज नियमित सात तासांची झोप घेतो. त्यामुळे तो सगळं श्रेय कष्ट करून केलेल्या कामाला, नियमित व्यायाम आणि सवयींना देतो. त्याचबरोबर तो स्वतःच्या भावाला याचा मार्गदर्शक मानतो. त्यामुळे शिस्तबद्ध दिनचर्येमागे अनेकदा एक शांत मार्गदर्शन असते, जे या कामगाराने आपल्याला सांगितले आहे.

सौंदर्याच्या पलीकडची ताकद

त्याचा प्रवास केवळ त्याच्या दिसण्यामुळे नाही, तर तो शरीराला कसे कार्य करावे यांसाठी प्रशिक्षित करतो. त्याची रोजची मेहनत त्याला नकळत ताकद देऊन जाते. बहुतेक व्यायामशाळांमधील दिनचर्या केवळ नक्कल करण्याचा प्रयत्न करतात; पण ही दिनचर्या कोणत्याही फिल्टरशिवायची आहे. त्यामध्ये कोणताही शॉर्टकट नाही, कोणताही गाजावाजा नाही, केवळ अनेक वर्षांचे सातत्य आणि तुमचे प्रयत्न महत्वाचे आहे आणि कदाचित हाच त्यातून मिळणारा धडा आहे. तुम्हाला नेहमीच सर्वांत प्रगत योजनेची गरज नसते. कधी कधी आपल्याला फक्त अशा एका नित्यक्रमाची गरज असते, ज्याचे आपण नियमितपणे पालन करू शकतो.