How Lemon Controls Diabetes & Blood Sugar: मधुमेह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुख्य म्हणजे डायबिटीज म्हणजेच मधुमेहाची सुरुवात म्हणजे अन्य आजारांनाही आमंत्रण असते. हृदयाचे विकार ते मेंदूवर तणाव या सगळ्या कारणांसाठी रक्तातील साखरेची वाढलेली पातळी मुख्य कारण ठरु शकते. स्वादुपिंडातील इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढू शकते यामुळेच साखरेच्या पातळीत वाढ होते. मधुमेहाच्या रुग्णांना नियमित आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्वच गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य ती काळजी न घेतल्यास हृदय, लिव्हर, किडनी व फुफ्फुसाच्या आजारांचा धोका वाढू शकतो.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोषक आहार, नियमित व्यायामासह काही आयुर्वेदिक व घरगुती उपायांनीसुद्धा आपण रक्तातील साखर नियंत्रित ठेवू शकता. आयुर्वेदानुसार मधुमेह रुग्णांसाठी लिंबाचे सेवन फायद्याचे ठरू शकते. व्हिटॅमिन सी चा खजिना असणाऱ्या इवल्याश्या लिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे परिणामी अनेक आजार होण्याआधीच थांबवता येतात. चला तर मग आज जाणून घेऊयात लिंबामुळे मधुमेहींना काय फायदा होऊ शकतो..

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लिंबू..

लिंबात क जीवनसत्व, कॅल्शियम, पोटॅशियम व अँटी- इन्फ्लेमेंटरी तसेच अँटी मायक्रोबियल (वाईट बॅक्टरीयाला रोखणारे) गुणतत्व असतात. तसेच लिंबाचा ग्लायसेमिक इंडेक्स अगदीच कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते . लिंबातील अँटी ऑक्सिडंट्समुळे स्वादुपिंडातील पेशी सक्रिय राहतात परिणामी चयापचय क्रिया वेगाने होते. आयुर्वेदानुसार नियमित एका लिंबाच्या सेवनाने साखरेवर नियंत्रण ठेवण्यात मदत होऊ शकते.

Early Signs of Pregnancy: पिरीएड्स उशिरा येण्यासह शरीरातील ‘हे’ बदल ठरतात गर्भधारणेचे लक्षण

लिंबाचे आरोग्यकारी फायदे

  • लिंबाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शकतो वाढते व शरीर सुदृढ होते
  • लिव्हर व किडनीसाठी लिंबू डिटॉक्सचे काम करतो. मधुमेहाच्या रुग्णांना किडनी व लिव्हरच्या विकारांचा सर्वात जास्त धोका असतो, त्यामुळे लिंबाचे सेवन तुम्हला वरदान ठरू शकते.
  • लिंबाच्या सेवनाने शरीरात अतिरिक्त फॅट्स कमी होतात. कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी लिंबू गुणकारी ठरतो.

Blood Sugar Level Per Age: तुमच्या वयानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण किती असायला हवे? पाहा ‘हा’ तक्ता

  • लिंबातील एस्कॉर्बिक ऍसिड व व्हिटॅमिन सी मुळे शरीरातील मेद विरघळण्यास मदत होते.
  • बद्धकोष्ठचा त्रास असल्यास लिंबाच्या सेवनाने फरक जाणवू शकत, लिंबातील फायबर व मेटाबॉलिज्म पचनक्रिया सुधारतात.

(टीप- वरील लेख माहितीपर आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)