How much beer to drink in one time: एकाच वेळी खूप जास्त बिअर पिणे जीवघेणे ठरू शकते. पण, नेमकी किती मात्रा धोकादायक असते हे समजणे सोपे नसते. मित्रांसोबत बसून मद्यपान करताना आपल्यापैकी फार कमी जण शरीराची एक मर्यादा असते याकडे लक्ष देतात. खरं म्हणजे दारू प्यायल्यामुळे मृत्यू होण्यासाठी ठरलेली अशी एकच ठराविक मात्रा नसते. चला तर मग, जाणून घेऊया की किती बिअर पिणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते?
तुमच्यासाठी किती बिअर पिणे धोकादायक ठरू शकते?
आरोग्याविषयी माहिती देणाऱ्या हेल्थलाईन या वेबसाइटनुसार, शरीर दारू एका ठराविक वेगानेच पचवू शकते. साधारणपणे यकृत (लिव्हर) एका तासात सुमारे एक स्टँडर्ड ड्रिंक प्रक्रिया करू शकते. जर एखादी व्यक्ती खूप लवकर-लवकर दारू पित असेल, तर रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण झपाट्याने वाढते.
ब्लड अल्कोहोल कन्सन्ट्रेशन (BAC) ०.०८ टक्क्यांपर्यंत पोहोचले तर बहुतेक ठिकाणी त्या व्यक्तीला नशेत मानले जाते. पण, हेच प्रमाण ०.४० टक्के किंवा त्याहून जास्त झाले, तर परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा वेळी कोमात जाण्याचा) किंवा मृत्यूचा धोका वाढतो.
एका स्टँडर्ड ड्रिंकमध्ये सुमारे १४ ग्रॅम शुद्ध अल्कोहोल असते. हे अंदाजे १२ (Ounce-oz) (सुमारे ३५० मि.ली.) ५% अल्कोहोल असलेली बिअर, ५ oz वाइन किंवा १.५ oz हार्ड ड्रिंक इतके असते.
साधारणपणे एक स्टँडर्ड ड्रिंक घेतल्याने BAC सुमारे ०.०२ टक्क्यांनी वाढू शकते. म्हणजेच काहीच ड्रिंकमध्ये व्यक्ती कायदेशीररित्या नशेत मानली जाऊ शकते. पण, जीवघेण्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी यापेक्षा खूप जास्त प्रमाण लागते.
सरासरी एखाद्या व्यक्तीला ०.४०% BAC पर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे २५ स्टँडर्ड ड्रिंक घ्यावे लागू शकतात. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या व्यक्तीनुसार बदलते. हेही लक्षात ठेवा की, ग्लासमध्ये दिली जाणारी बिअर अनेकदा स्टँडर्ड प्रमाणापेक्षा जास्त असते किंवा त्यात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे धोका वाढू शकतो.
ओव्हरडोसची लक्षणे काय असतात?
अल्कोहोल ओव्हरडोसची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. वारंवार उलटी होणे, त्वचा पिवळी किंवा निळसर पडणे, हृदयाची गती मंदावणे, शरीराचे तापमान कमी होणे, श्वास खूप मंद किंवा अनियमित होणे, गोंधळल्यासारखे वाटणे, झटके येणे किंवा बेशुद्ध पडणे – हे सर्व गंभीर इशारे आहेत.
जर एखाद्याचा श्वासोच्छ्वास दर मिनिटाला आठपेक्षा कमी झाला किंवा ती व्यक्ती जागीच होत नसेल तर तात्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. दारूचा परिणाम फक्त त्या रात्रीपुरता मर्यादित राहत नाही.
रिकाम्या पोटी दारू प्यायल्यास अल्कोहोल लवकर रक्तात मिसळते आणि कमी प्रमाणातही जास्त नशा होऊ शकते. पाणी कमी पिणे, पटकन ड्रिंक संपवणे किंवा इतर पदार्थांसोबत दारू पिणे यामुळेही धोका वाढतो, म्हणूनच जेवणासोबत दारू पिणे, प्रत्येक ड्रिंकदरम्यान पाणी पिणे आणि एका तासात एकापेक्षा जास्त ड्रिंक न घेणे हे शहाणपणाचे मानले जाते.

