Is Wine Fine or Beer Better: कमी प्रमाणात दारू प्यायल्यानेही कॅन्सर होतो का? जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवर विश्वास ठेवला तर, डब्ल्यूएचओच्या युरोपियन प्रदेशात कॅन्सर हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे, कारण सर्व प्रकारच्या अल्कोहोलच्या सेवनामुळे कॅन्सर होऊ शकतो. जरी ते कमी असले तरीही, जसे की १.५ लिटरपेक्षा कमी बिअर किंवा ३.५ लिटरपेक्षा कमी दारूचे सेवन यानेही कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

डब्ल्यूएचओने द लॅन्सेट पब्लिक हेल्थला आपले निवेदन प्रसिद्ध केले आणि स्पष्ट केले की अल्कोहोलच्या बाबतीत कोणतीही सुरक्षित मर्यादा नाही. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने काही दशकांपूर्वी अल्कोहोलला गट 1 कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले आहे. आतड्यांच्या आणि स्तनाच्या कर्करोगासह किमान सात प्रकारच्या कर्करोगाशी त्याचा संबंध आहे. इथेनॉल (Alcohol) शरीरात तुटल्यामुळे कर्करोग होतो. त्याच वेळी, बहुतेक महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी अल्कोहोल जबाबदार आहे. ज्यामध्ये युरोपियन युनियन (EU) देशांमध्ये सर्वाधिक प्रकरणे दिसून आली आहेत.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

अल्कोहोल आणि कॅन्सरचा संबंध

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI) चे प्रोफेसर डॉ. के श्रीनाथ रेड्डी म्हणतात, “एखादी व्यक्ती स्वत: ठरवू शकते की ती हेल्दी आहारासोबत कमी प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करू शकते का? तथापि, याच्या जास्त सेवनाने आरोग्याच्या जोखमीची पूर्ण जाणीव त्याला असली पाहिजे.”

ते पुढे म्हणाले की, “मद्य सेवनाचे दुष्परिणाम शरीराच्या अवयवांवर अनेक प्रकारे परिणाम करतात. अनेक ठिकाणी कॅन्सरसोबतच हृदय, यकृत, स्वादुपिंड आणि न्यूरोलॉजिकल आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आजार, रस्त्यावरील अपघात आणि इतर प्रकारच्या हिंसाचाराचाही दारूशी संबंध आहे. अगदी कमी प्रमाणात अल्कोहोल देखील न्यूरोनल ट्रान्समिशनवर परिणाम करून मेंदूच्या कार्यामध्ये व्यत्यय आणू शकते. काही परिणाम तात्पुरते असतात परंतु काही परिणाम दीर्घकाळ टिकणारे असून नुकसान करतात.”

(हे ही वाचा: महिनाभर फक्त ‘हा’ रस प्यायल्याने युरिक ॲसिडची समस्या झपाट्याने कमी होईल? सेवनाची पद्धत जाणून घ्या)

दारू प्यायल्याने ‘या’ आजारांचा धोका वाढू शकतो

भारतातील अल्कोहोलच्या परिणामांविषयी तपशीलवार माहिती देताना डॉ. रेड्डी म्हणतात, “अल्कोहोलचे परिणाम हे पिण्याच्या पद्धतीवर, मद्यपानाचा प्रकार आणि इतर जोखीम घटकांच्या उपस्थितीवर अवलंबून असतात. मेडिटेरेनियन डाइटचे अनेक सकारात्मक परिणाम आहेत जे अल्कोहोलच्या हानिकारक प्रभावांचा सामना करतात. त्याच वेळी, भारतासह इतर अनेक देशांमध्ये केलेल्या अभ्यासात, अल्कोहोल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नसते. वाढलेला रक्तदाब आणि स्ट्रोकचा वाढलेला धोका हे अल्कोहोलच्या सेवनाचे चिंताजनक परिणाम आहेत. अल्कोहोलच्या अतिसेवनाने हार्ट अटॅक येण्याची देखील संभावना असते. अल्कोहोलमध्ये उच्च कॅलरी सामग्री असते (७ कॅलरीज प्रति ग्रॅम) आणि यामुळे अतिरिक्त आरोग्य धोक्यांसह जास्त वजन आणि लठ्ठपणाची समस्या वाढते. विशेषत: तरुणांमध्ये, अपघाती मृत्यू ही सार्वजनिक आरोग्याची प्रमुख चिंता आहे.”

दारू पिल्याने शरीराला फायदा होतो का?

PHFI ची रिसर्च आणि हेल्थ प्रोमोशनची प्रोफेसर मोनिका अरोडा म्हणतात की, “भारताने इतर अनेक देशांनी स्वीकारलेले राष्ट्रीय NCD (असंसर्गजन्य रोग) धोरण स्वीकारले आहे. या अंतर्गत भारताने २०२५ पर्यंत दारूचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य स्वीकारले आहे. आणि सल्लागार डायबेटोलॉजिस्ट डॉ आर एम अंजना म्हणतात, “तुम्ही अजूनपर्यंत मद्यपान सुरू केले नसेल, तर सुरू करण्याचा प्रयत्नही करू नका कारण त्याचा कोणताही अतिरिक्त फायदा होणार नाही. तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर त्यावर मर्यादा घाला.

( हे ही वाचा: तुमच्या वयानुसार तुम्हाला किती झोप घेणं गरजेचं आहे? पाहा सोपा तक्ता)

आठवड्यात किती दारू प्यावी?

यूरोपमधील WHO च्या रिजिनल ऑफिसमध्ये अल्कोहल आणि बेकायदेशीर ड्रग्सचे क्षेत्रीय सल्लागार डॉ कॅरिना फेरेरा-बोर्गेस यांच्या म्हणण्यानुसार, दारूच्या पहिल्या थेंबाच्या सेवना पासूनच समस्या सुरू होतात. अल्कोहोलच्या सुरक्षित पातळीबद्दल काहीही बोलले जात नाही कारण तुम्ही किती पिता याचा फरक काहीही पडत नाही. खरं तर, मद्यपान करणार्‍यांच्या आरोग्यासाठी जोखीम दारूच्या पहिल्या थेंबापासून सुरू होते. फक्त एकच गोष्ट खात्रीने सांगू शकतो की तुम्ही जितके दारूचे सेवन तितकी ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही जितकी कमी दारू प्याल कमी प्याल तितकी ती तुमच्यासाठी सुरक्षित आहे.

जागतिक स्तरावर, डब्ल्यूएचओ युरोपियन प्रदेशात सर्वात जास्त मद्यपान केले जाते आणि लोकसंख्येमध्ये मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या प्रदेशातील 200 दशलक्षाहून अधिक लोकांना दारूमुळे कर्करोगाचा धोका आहे.