मधुमेह ही संपूर्ण जगासाठी मोठी समस्या आहे. प्रत्येक घरामध्ये एक तरी रुग्ण हा मधुमेहग्रस्त असतो. WHO च्या मते, ४२२ दशलक्ष लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यापैकी १.५ दशलक्ष लोकांचा दरवर्षी मधुमेहामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आहे. मधुमेह हा एक प्रकारचा सिंड्रोम आहे जो स्वतः एक आजार नसून इतर अनेक आजारांना कारणीभूत ठरतो. सुरुवातीला, हे अगदी किरकोळ लक्षणे दाखवतात, म्हणून आपल्याकधील लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. पण ही लक्षणे नंतर खूप गंभीर होतात आणि इतर अनेक आजारांना जन्म देतात.

वास्तविक, जेव्हा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि ग्लुकोज शोषून घेणारे इन्सुलिन कमी होते किंवा काम करणे थांबवते तेव्हा मधुमेहाचा आजार होतो. ग्लुकोज साखरेपासून बनते. ते अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करते. मधुमेहपूर्व अवस्थेत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवल्यास मधुमेह होण्याचा धोका खूप कमी होऊ शकतो. म्हणूनच रक्तातील साखरेचे प्रमाण खरोखर किती असावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

( हे ही वाचा: Uric Acid: ‘या’ ४ आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही युरिक अॅसिड आणि सांधेदुखीपासून मुक्त होऊ शकता; जाणून घ्या तज्ज्ञांकडून)

रक्तातील साखर किती असावी

रक्तातील साखरेचे प्रमाण किती असावे, हे एकूण आरोग्य, वय, आरोग्य स्थिती आणि मधुमेह किती दिवस आहे यावर अवलंबून असते. जर कोणताही आजार नसेल, तर १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढ व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ९९ मिलीग्राम प्रति डेसीलिटर किंवा त्याहून कमी असावे. त्याच वेळी, अन्न खाल्ल्यानंतर एक ते दोन तासांनी, रक्तातील साखर १४० मिलीग्राम प्रति डेसीलिटर असावी. ४० वर्षांनंतर रक्तातील साखरेची वारंवार तपासणी करावी. जर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.

४५-५० वर्षे वयाच्या रक्तातील साखरेची पातळी किती असावी

४५-५० वर्षे वयाच्या मधुमेही रुग्णांसाठी, त्यांची फास्टिंग शुगर ९० ते १३० mg/dL असावी. जेवणानंतर साखरेची पातळी १४० mg/dl पेक्षा कमी असावी. रात्रीच्या जेवणानंतर १५० mg/dl ची पातळी सामान्य मानली जाते. जर ४५-५९ व्या वर्षी साखरेची पातळी ३०० च्या पुढे गेली तर ती तुमच्यासाठी समस्या बनू शकते.

( हे ही वाचा: थकवा, मळमळ या लक्षणांचा आहे थेट हृदयाशी संबंध; ‘या’ गोष्टी ठरू शकतात हार्ट अटॅकसाठी कारणीभूत, जाणून घ्या)

रक्तातील साखर कशी कमी करावी

रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणे याला हायपरग्लायसेमिया म्हणतात. त्यावर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर रक्तात साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असेल तर लगेच जीवनशैलीत बदल करा. कोणताही ताण घेऊ नका. भरपूर व्यायाम करा, खूप चाला, घरातील छोटी-मोठी कामे स्वतः करा. साखर, अति मीठ, कोल्ड्रिंक्स, मिठाई खाण्यावर बंदी. जास्त कर्बोदके असलेले पदार्थ खाऊ नका. सकस अन्न खा. जेवणात रोज सॅलड घ्या. जास्त वेळ उपाशी राहू नका. प्रक्रिया केलेले अन्न अजिबात खाऊ नका. आहारात शक्यतो हिरव्या पालेभाज्या खात जा. अधिकाधिक फळे खा.