scorecardresearch

तुमच्या वयानुसार दिवसाला किती कॅलरीज खायला हव्यात? परफेक्ट बॉडीसाठी पाहा सोपा तक्ता

How Much Calories Do We Need Per Day: तुमच्या शरीराला उंची व वयानुसार कॅलरीजची आवश्यकता असते. शरीराचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी निदान एवढ्या कॅलरीजचे सेवन करणे हे गरजेचे असते.

How Much Calories Do We Need As Per Age Height And Weight Check Easy Chart To Understand BMI Ratio
तुमच्या वयानुसार दिवसाला किती कॅलरीज खायला हव्यात? (फोटो: Pixabay)

Calorie Count As Per Age: वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास तुम्ही दिवसभरात किती कॅलरीजचे सेवन करता हे पाहणे सर्वात महत्त्वाचे ठरते. वजन वाढणे, कमी होणे व नियंत्रणात राहणे या तिन्ही गोष्टींसाठी कॅलरीचे मोजमाप करावेच लागते. काहींच्या मते वजन कमी करायचे तर अगदीच काही न खाणे किंवा वजन वाढवायचं तर भरपूर कॅलरीज असणारे पदार्थ खाणे असे दोन टोकाचे मार्ग अनेकजण निवडतात. पण मंडळी यामुळे शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमच्या शरीराला उंची व वयानुसार कॅलरीजची आवश्यकता असते. शरीराचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी निदान एवढ्या कॅलरीजचे सेवन करणे हे गरजेचे असते. आज आपण तुमच्या वयानुसार तुम्हाला दररोज किती कॅलरीज खायला हव्यात हे पाहणार आहोत. त्यासाठी खाली दिलेला हा तक्ता नक्की तपासून पाहा.

महिलांना वयानुसार दिवसाला किती कॅलरी गरजेच्या? (How Many Calories Women Need In Day)

वय दिवसाला किती कॅलरी खाव्यात?
2-4 वर्ष 1000-1400
5-8 वर्ष 1200-1800
9-13 वर्ष 1400-2200
14-18 वर्ष 1800-2400
19-30 वर्ष 2000-2400
31-59 वर्ष 1800-2200
60+ वर्ष 1600-2000

पुरुषांना वयानुसार दिवसाला किती कॅलरी गरजेच्या?(How Many Calories Men Need In Day)

वय दिवसाला किती कॅलरी खाव्यात?
2-4 वर्ष 1000-1400
5-8 वर्ष 1200-1800
9-13 वर्ष 1400-2200
14-18 वर्ष 1800-2400
19-30 वर्ष 2400-3000
31-59 वर्ष 2200-3000
60+ वर्ष 2000-2600

वजन कमी करायचे असल्यास..

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नियमित कॅलरीजमधील ५०० कॅलरी कमी करण्याचा सल्ला दिला जातो. याचा अर्थ जर तुम्हाला २००० कॅलरीज/दिवसाची गरज असेल, तर तुम्ही आठवड्यातून १,५०० कॅलरीज/प्रति दिवस कमी करायला हव्या. वजन कमी करणे ही एक संथ प्रक्रिया आहे त्यामुळे योग्य डाएट प्लॅनसाठी आपल्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल. प्रत्येक शरीराची गरज वेगळी असते त्यामुळे स्वतः स्वतःच्या अंदाजाने निर्णय घेणे टाळा व तज्ज्ञांशी बोलून मगच तुमचा प्लॅन ठरवा.

हे ही वाचा<< तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असायला हवे? Perfect बॉडी साठी पाहा सोप्पा तक्ता

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कॅलरीजची गरज ओळखण्यासाठी केवळ वयच नव्हे तर तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात, तुमचे वजन किती आहे हे मुद्दे सुद्धा महत्त्वाचे ठरते. आता या क्षणी तुम्ही वरील तक्त्याहून कमी अधिक कॅलरीजचे सेवन करत असाल तर घाबरून जाऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नीट तुमचा डाएट प्लॅन बनवून घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 11:27 IST
ताज्या बातम्या