Hair Care Tips: सध्या वाढत्या प्रदूषणामुळे केस गळण्याची समस्या वाढली आहे. केस जास्त गळतायत हे पाहून आपण लगेच केमिकलवाले शॅम्पू वापरतो. मात्र, याचे केसांवर होणारे परिणाम आपल्याला माहीत नसतात. आपण एखादा शॅम्पू खरेदी केल्यावर त्या मागील तपशीलाची पडताळणी करत नाही. गेल्या काही वर्षांपासून शैम्पूमध्ये सल्फेटवर भरपूर लक्ष केंद्रित केले जात आहे. शॅम्पूमध्ये असलेला सल्फेट टाळू आणि केस स्वच्छ करतात. परंतु काही संशोधक असेही सुचवतात की ते तुमच्या केसांमधून आवश्यक तेल काढून टाकतात आणि त्यामुळे तुमचे केस गळू लागतात. दिवसातून आपले बरेच केस गळतात. मात्र, एका दिवसात किती केस गळणे सामान्य आहे याबाबत तुम्हाला माहित आहे. चला तर मग जाणून घेऊया दिवसातून किती केस गळणे हे सामान्य मानलं जातं. तसंच तुम्ही केसांची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे.

केसांची काळजी घेण्याच्या टिप्स

  • एका दिवसात १०० ते १५० केस गळणे हे सामान्य आहे, त्यामुळे दररोज इतके केस गळत असल्यास घाबरू नका.
  • मात्र, यापेक्षा जास्त केस जर गळत असतील तर तुम्हाला चिंता करण्याची गरज आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • ओले केस अधिक काळजीपूर्वक विंचरा कारण ते नाजूक आणि तुटण्याची शक्यता असते.
  • रुंद दात असलेला कंगवा घ्या आणि केसांमधून शक्य तितक्या हळूवारपणे मुळापासून टोकापर्यंत चालवा.
  • रफ केसांपासून मुक्त होण्यासाठी दर काही आठवड्यांनी केस ट्रिम करा.
  • दर ६ ते ८ आठवड्यांनी तुमचे केस सुमारे १/४ इंच कापून टाका जेणेकरून स्प्लिट एंड्स पुन्हा वाढणार नाहीत.
  • आपले केस दररोज धुवू नका आणि जेव्हाही धुवाल तेव्हा केसांच्या टोकांना कंडिशनर लावा.
  • एकाच ब्रँडचा शॅम्पू आणि कंडिशनर वापरून पहा.
  • कंडिशनर थंड पाण्याने धुवा कारण ते मजबूती आणि चमक दोन्हीसाठी चांगले आहे.

( हे ही वाचा: केसांमधील कोंडामुळे केस गतायत? ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा, नक्कीच फायदा मिळेल)

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Sagittarius April Horoscope
Sagittarius : धनु राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात घ्यावी विशेष काळजी; कशी असेल त्यांची आर्थिक स्थिती अन् लव्ह रिलेशन? जाणून घ्या

पाहा व्हिडीओ –

केसांसाठी नैसर्गिक हेअर कंडिशनिंग

नैसर्गिक हेअर कंडिशनिंग बनविण्यासाठी थोडे बदाम तेल, खोबरेल तेल, हेअर कंडिशनर, २५०मिली पाणी आणि एक छोटी रिकामी स्प्रे बाटली घ्या. एका स्प्रे बाटलीत २०० मिली पाणी घाला आणि त्यात २ ते ३ थेंब खोबरेल तेल आणि ४ ते ५ थेंब बदाम तेल घाला. त्यानंतर कंडिशनरचे दोन अगदी लहान थेंब घाला. कंडिशनरचा जास्त वापर करू नका नाहीतर फेस येईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात लॅव्हेंडर किंवा चांगले वासाचे तेल घालू शकता. नंतर त्यात उरलेले पाणी घालून नीट ढवळून घ्या. जेव्हा तुम्ही शॅम्पूने केस धुवाल, त्यानंतर हे मिश्रण केसांच्या खालच्या भागात लावून धुवा. ही नैसर्गिक कंडिशनिंगची पद्धत आहे.