हिवाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. कोणताही विषाणू शरीरावर हल्ला करू शकतो आणि याचमुळे या काळात आपण जास्त आजारी पडतो. त्यातच जगभरात अजून करोनाची भीती कायम असून तिसरी लाट सुद्धा येऊन ठेपली आहे. ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराबद्दल शास्त्रज्ञांचं अस मत आहे की हा प्रकार करोनाच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक घातक आणि संसर्गजन्य आहे.

करोना (Corona) विषाणूने जगात हाहाकार माजवला आहे. अद्याप याचा कहर कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. करोना महामारी सुरु झाली तेव्हापासूनच आपण एक गोष्ट सातत्याने ऐकतोय म्हणजे ती म्हणजे इम्युनिटी. आरोग्य तज्ञांनुसार कमी इम्युनिटी असल्यास संक्रमणाचा (Omicron Infection Rate) धोका वाढू शकतो. अशातच इम्युनिटी वाढवणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आपण अशा पदार्थांचे सेवन करायला हवे ज्यातून आपली इम्युनिटी वाढण्यास मदत होईल. हिवाळ्यात आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असणे आवश्यक आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

मनुके :

अँटी-ऑक्सिडेंट्सची भरपूर मात्र असलेले मनुके आपल्या शरीराला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. तसेच मनुक्यांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स सोबतच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशिअम, बीटा कॅरेटिन आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन असते. हे आपल्या इम्युनिटीला बळकट करण्यासोबतच हाडांना मजबूत करतात.

बदाम :

बदामाचे फायदे तर आपण सर्वच जाणतो. बदाम खाल्ल्याने फक्त आपली इम्यूनिटीचं वाढत नाही तर याच्या सेवनाने आपली हाडं सुद्धा मजबूत होतात. यात व्हिटॅमिन ई सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध असते जे रोगांपासून लढण्यात सहाय्यक भूमिका बजावते. बदाम हे व्हायरस आणि बॅक्टेरियांचा प्रभाव कमी करते.

हळद :

हळदीचा वापर प्राचीन आयुर्वेदापासून चालत आलेला आहे. हळदीमध्ये असलेले औषधीय अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत. हळदीमध्ये करक्युमिन हा एक मुख्य घटक आहे जो हळदीमधील बहुतांश आरोग्यदायी लाभासाठी कारणीभूत आहे. इम्यून सिस्टमला (Immune system) मजबूत करण्यासाठी याचा प्रयोग केला जातो.

रताळे :

हिवाळ्यात रताळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम तसेच इतर अनेक पोषक तत्त्व आहेत. यामुळे रताळे खाल्ल्याने आपली इम्युनिटी मजबूत होते. त्याचबरोबर रताळे हे व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरेटिनचा एक उत्तम स्रोत आहे.

या ऋतूमध्ये पोषक तत्त्वांनी भरपूर असणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्याने हंगामी आजारांचा धोका कमी होऊ शकतो असे आरोग्य तज्ञांचे असे मानणे आहे. अशातच हिवाळ्यात सुका मेवा खाल्ल्याने एम्युनिटी मजबूत होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार (WHO Guidelines) मास्कशिवाय घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर पाळावे, आपल्या हातांच्या तसेच संपूर्ण शरीराच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करावे.