scorecardresearch

काकडी ताजी आहे की कडू कसे ओळखाल? उन्हाळ्यात शॉपिंग करताना ‘या’ ५ टिप्स लक्षात ठेवा

How To Buy Fresh Cucumbers: बाजारात काकडी विकत घेतानाच तुम्ही एका नजरेत कशी काकडीची परीक्षा करू शकता हे जाणून घेऊया..

How To Buy Fresh Cucumbers Avoid Bitter Salads And Detox Water Find Fruits With Less Seeds With Simple Kitchen Hacks
काकडी ताजी आहे की कडू कसे ओळखाल? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

How To Buy Fresh Cucumbers: उन्हाळ्याचा सीझन सुरु झाला आहे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी या दिवसात अधिकाधिक पाणी व द्रव पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यामध्ये अनेक आहारतज्ज्ञ काकडी खाण्याचा सल्ला आवर्जून देतात. काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच शरीराचे डिटॉक्स करण्यासाठी सुद्धा पाण्यात काकडीचे काप व लिंबू-पुदिना घालून प्यायले जाते. सॅलेडमध्ये सुद्धा काकडी चवीला बेस्ट लागते. आत एवढ्या बहुगुणी काकडीची निवड करताना सतर्क राहणे आवश्यक आहे. कधीतरी तुम्हीही फार हौशीने बाजारातून काकड्या आणल्या असतील आणि कापायला घेतल्यावर त्याचा पहिलाच घास अत्यंत कडू लागला असेल. यापुढे असं होऊ नये म्हणून आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. बाजारात काकडी विकत घेतानाच तुम्ही एका नजरेत कशी काकडीची परीक्षा करू शकता हे जाणून घेऊया..

चांगली काकडी कशी ओळखायची? (How To Buy Good Cucumbers)

१) काकडी खरेदी करताना, गडद हिरव्या रंगाची आणि टणक काकडी निवडा. साधारण फिकट छटा असणाऱ्या किंवा पिवळसर काकड्या जुन्या व जास्त पिकलेल्या असतात. ज्या चवीला कडवट लागू शकतात.

२) तुम्ही खरेदीला जाता तेव्हा भाजी हातात घ्या व हलके दाबून पाहा. तुम्हाला कुठेही काकडी नरम झालेली जाणवली तर खरेदी करू नका. जर तुमच्या बोटाच्या दाबाने काकडी तुटत असेल तर ती काकडीत बिया व रस जास्त असल्याचे समजून जा. अधिक जुनाट बिया या कडवट लागतात.

३) दुर्दैवाने, भाज्या जास्त काळ टिकण्यासाठी, बरेच उत्पादक भाज्यांच्या वर मेण लावतात. त्यामुळे तपासण्यासाठी तुमच्या नखांचा वापर करून काकड्या किंचित खरडवून पहा.

४) आकाराने लहान आणि बारीक काकडी निवडा. लहान काकड्या ताज्या असतात आणि त्यात कमी बिया असतात.

५) काकडी सरळ आकाराची असेल असे बघा. वाकड्या काकड्या चवीला कडू शकतात.

हे ही वाचा<< नारळामध्ये जास्त पाणी व खोबरं आहे का कसे ओळखाल? ‘या’ सात सोप्या टिप्स नेहमी लक्षात ठेवा

आम्ही आशा करतो की या टिप्स वापरून आपणही उत्तम गोष्टीचीच खरेदी कराल. तुमच्याकडेही अशा काही पारंपरिक टिप्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 09:47 IST