प्रत्येकाला वाटते की त्यांना परफेक्ट जोडीदार मिळावा. अनेकदा शोधूनही मनासारखा जोडीदार मिळत नाही आणि पदरी निराशा येते. प्रत्येक व्यक्ती अशा जोडीदाराच्या शोधात असते जो त्यांना आयुष्यभर जपणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा, त्यांची काळजी घेणारा, त्यांचा आदर करणारा, त्यांना वैयक्तिक स्पेस देणारा असेल. पण अनेकदा जोडीदार शोधताना चुकीचा जोडीदार निवडत आहोत का, याची सतत भीती असते.
आज आपण आपला होणारा जोडीदार आपल्यासाठी योग्य आहे का, हे कसे ओळखायचे ? या विषयी जाणून घेणार आहोत.

पहिली भेट

होणाऱ्या जोडीदारासोबतची पहिली भेट ही खूप जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे पहिल्या भेटीत जर तुम्ही काही गोष्टींचे निरीक्षण केले तर तुम्हाला समोरची व्यक्ती परफेक्ट लाइफ पार्टनर आहे की नाही, हे ओळखता येईल.

Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण
Viral Video Lionesses Attack Lion Buffalo Fight Video
VIDEO: “फक्त साथ देणारा कट्टर पाहिजे” म्हशीची शिकार करण्यासाठी सिंहीणीचा घेराव, पण…पुढे काय घडतं पाहाच

त्यांच्यासोबत घालवलेला वेळ

जर तुम्ही अरेंज मॅरेज करत असाल आणि अनोळखी व्यक्तीला पहिल्यांदा भेटत असाल तर काही गोष्टींचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. भेटीदरम्यान तुम्हाला त्यांच्यासोबत सुरक्षित आणि निवांत वाटत असेल तर कदाचित तुम्ही योग्य व्यक्तीसोबत आहात. जर या व्यक्तीसोबत पहिल्या भेटीतच तुमची घट्ट मैत्री झाली तर तुम्हाला त्यांच्यासोबत आयुष्य घालवणे अधिक सोपे जाईल.

हेही वाचा : तुम्हीच खराब करताय तुमचं नातं! आजच सोडा तुमच्या ‘या’ चुकीच्या सवयी, अन्यथा नंतर पश्चताप होईल!

हावभाव

अनेकदा काही लोकांचा स्वभाव हा बोलण्यातून समजत नाही तर हावभावावरून कळतो. समोरची व्यक्ती तुमच्या नजरेला नजर मिळवून बोलतेय की नाही किंवा तुमचे बोलणे मनापासून ऐकते आहे की नाही, हे ओळखा. यावरून तुम्ही त्या व्यक्तीसोबत तुमच्या भविष्याबाबत विचार करू शकता.

इतरांसोबत त्यांची वागणूक

अनेकदा होणारा जोडीदार पहिल्या भेटीत तुमच्यासोबत खूप चांगला वागू शकतो कारण त्यांना तुम्हाला इम्प्रेस करायचे असते, पण पहिल्या भेटीतही तुम्ही त्याचा स्वभाव ओळखू शकता. तो इतरांसोबत कसा वागतो, आजूबाजूचे लोक, वेटर किंवा स्थानिक लहान मुलांशी तो कसा वागतो, यावरूनही तुम्ही त्याचा खरा स्वभाव ओळखू शकता.

हेही वाचा : Relationship Guide: पार्टनरला चुकूनही विचारू नका ‘हे’ प्रश्न; माहिती हवीच असेल तर ‘हा’ स्मार्ट पर्याय वापरा

त्याचे प्रश्न

डेट किंवा भेटीदरम्यान दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटतात. पहिल्याच डेटवर ते तुम्हाला कसे प्रश्न विचारताहेत, वैयक्तिक किंवा प्रोफेशनल लाइफविषयी किती जाणून घेण्याचा प्रयत्न करताहेत, यावरून तुम्ही समोरची व्यक्ती तुमच्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी किती उत्सुक आहे, हे ओळखू शकता.