How to clean exhaust fan in kitchen?: बहुतांश स्वयंपाक घरांमध्ये एक्झॉस्ट पंखे असतातच. रोज किचनमध्ये स्वयंपाक होत असताना ते आपण चालू करून ठेवतो. जेणेकरून स्वयंपाक करताना तयार होणारा सगळा धूर, वाफा त्या पंख्याद्वारे घराबाहेर फेकल्या जातात. पण यामुळे एक्झॉस्ट पंखा मात्र चांगलाच चिकट, तेलकट होऊन जातो. त्याच्यावर चिकटपणाचा अक्षरश: काळा थर साचलेला असतो. तो स्वच्छ करणं हे खूप कठीण आणि वेळखाऊ काम. त्यामुळे ते करण्याचा अनेकांना खूप कंटाळा येतो आणि मग एक्झॉस्ट पंखा दिवसेंदिवस जास्तच घाण होत जातो .म्हणूनच पुढे सांगितलेला एक सोपा उपाय पाहा आणि अवघ्या काही मिनिटांत पंखा अगदी नव्यासारखा चकाचक करा..

डिशवॉशिंग लिक्विड आणि कोमट पाण्याने स्वच्छ करा

एक्झॉस्ट फॅनवरील काळे ग्रीस काढून टाकण्यासाठी भांडी धुण्याचे लिक्वीड आणि कोमट पाणी खूप प्रभावी आहे. एका भांड्यात कोमट पाणी भरा आणि त्यात थोडासा साबण घाला.आता या साबणात कापड किंवा स्पंज बुडवा आणि पंख पूर्णपणे पुसून टाका. काही मिनिटांतच, साचलेली घाण सैल होईल आणि निघून जाईल.

बेकिंग सोडा आणि लिंबू वापरा

बेकिंग सोडा आणि लिंबू हे देखील हट्टी डाग काढून टाकण्यास मदत करतात. एका भांड्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पंखांना लावा आणि १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर, ओल्या कापडाने पुसून टाका.यामुळे जुने डागही हलके होतात आणि पंखा चमकतो.

व्हिनेगरसह स्वच्छ

व्हिनेगर नैसर्गिक क्लिनर म्हणून काम करते. ते स्प्रे बाटलीत भरून तुमच्या पंखांवर बसू द्या. नंतर, मायक्रोफायबर कापडाने चांगले पुसून टाका. यामुळे ग्रीस आणि घाण सहज निघून जाते.

टुथपेस्ट

एक्झॉस्ट पंखा स्वच्छ करण्याचा आणखी एक सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला टुथपेस्ट वापरायचं आहे. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांचं मिश्रण करा. आणि ते काही मिनिटांसाठी पंख्यावर शिंपडून ठेवा. त्यानंतर टुथपेस्ट घ्या. जेवढं टुथपेस्ट असेल तेवढं त्यात मीठ घाला. आता हे मिश्रण पंख्याला लावून पंखा घासून काढा. काही मिनिटांतच तो अगदी स्वच्छ होईल.