Kitchen jugad video: मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही. जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही. मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात.. तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का? हो गॅसवर..याचा काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. तुम्हाला हा जुगाड विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.

आपण सकाळी उठल्यापासून गॅसवर चहा, नाश्ता, स्वयंपाक असं सतत काही ना काही करत असतो. स्वयंपाक करताना काही गोष्टी गॅसवर सांडतात आणि गॅसची शेगडी खराब होते. यातही दूध, तेल असं काही सांडलं की ही शेगडी फारच चिकट होऊन जाते. नियमितपणे ही शेगडी साफ केली तर ठिक नाहीतर त्यावर थर जमा व्हायला लागतात. एका गृहिणीने दाखवलेल्या या ट्रिकमध्ये संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर गॅसवर मीठ टाका आणि कमाल पाहा.

किचनची खरी मालकीण घरातील गृहिणी असते. ती रात्रंदिवस किचनमध्ये उभी राहून प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ तयार करते. यामुळे किचन अस्वच्छ होते. ओटा साफ करणे, भांडी आवरणे, सिंक स्वच्छ ठेवणे, यासह गॅस शेगडी साफ करणे ही मुख्य कामं तिला एकटीला करायला लागतात. जर आपण वर्किंग वूमन असाल तर, दररोज किचन साफ करायला वेळ मिळत नाही. मुख्य म्हणजे गॅस शेगडी लगेच खराब होते. अशावेळी गॅसवर मीठ टाका आणि कमाल पाहा.

नेमकं काय करायचं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्वयंपाक करुन झाल्यावर गॅसच्या शेगडीवर पाणी घाला आणि त्यावर सगळीकडे मीठ टाका. १५ मिनीटे हे तसेच ठेवा, तोपर्यंत इतर कामं करा. १५ मिनीटांनी सुक्या कापडाने साफ करा. मीठामुळे शेगडी एकदम चकाचक दिसेल. आतापर्यंत तुम्ही भांड्याचा साबण आणि लिक्विडने गॅस साफ केला असेल, मात्र एकदा मीठ वापरुन नक्की पाहा..

पाहा व्हिडीओ

https://youtu.be/7SabZMh2C04?si=Vmk11H6LFeqWlWgf

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@ Prajakta salveयूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.