scorecardresearch

DIY Cleaning Tips: किचन टाईल्सपासून ओव्हनपर्यंत, साफसफाईसाठी वापरा व्हिनेगर! जाणून घ्या कसे वापरावे?

leaning kitchen with white vinegar : व्हाईट व्हिनेगर डिस्टिल्ड किंवा स्पिरीट व्हिनेगर असते. ज्याचा उपयोग जेवण तयार करण्यासाठी केला जातो. सफाईसाठी या व्हिनेगरची मदत घेतली जाऊ शकते. चला जाणून घ्या व्हाईट व्हिनेगरचे काही प्रभावी उपयोग

how to clean kitchen with white vinegar
साफसफाईसाठी वापरा व्हिनेगर

House Cleaning Tips: घराची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. अनेक गोष्टींची स्वच्छता महिलांसाठी आव्हानापेक्षा कमी नाही. जसे घरातील करपलेली भांडी, ओव्हन, काच आणि सिंक साफ करणे. स्वयंपाकघरातील सर्व काही झपाट्याने स्निग्ध किंवा चिकट होऊ लागते, ते देखील स्वच्छ करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला अशा टिप्स आणि युक्त्या (Tips and tricks for cleaning) माहित असते आवश्यक आहेत ज्यामुळे तुमचे साफसफाईचे काम सोपे होईल, जेणेकरून साफसफाईचे काम जास्त कष्ट न करता लवकर करता येईल. साफसफाई करताना व्हाईट व्हिनेगरची मदत घेतली जाऊ शकते. यामुळे साफसफाईचे काम खूप सोपे होईल. व्हाईट व्हिनेगर(white vinegar)डिस्टिल्ड किंवा स्पिरिट व्हिनेगर आहे. याचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो पण साफसफाईमध्येही त्याची मदत घेता येते. व्हाईट व्हिनेगरचे काही प्रभावी उपयोग जाणून घेऊया.

व्हाईट व्हिनेगरचे काही प्रभावी उपयोग

कपलेली भांडी साफ करा
भांडी साफ करायला सोपी असतात पण भांडी करपली तर ते साफ करणं अवघड काम असतं. अशावेळी आपण व्हिनेगरच्या मदतीने करपलेली भांडी सहजपणे साफ करू शकतो. यासाठी एक कप व्हिनेगरमध्ये काही चमचे कांद्याचा रस मिसळा. जळालेल्या भांड्यावर ओता आणि ब्रशच्या मदतीने भांडी स्वच्छ करा. कोणत्याही प्रयत्नाशिवाय भांडी त्वरित साफ केली जातील.

हेही वाचा –Cleaning Hacks: साफसफाई केल्यानंतरही बाथरुममधून दुर्गंधी येतेय? मग या सोप्या टीप्स ठरतील फायदेशीर

सिंक साफ करा
स्वयंपाकघरातील सिंक स्वच्छ ठेवणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. सिंक साफ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर भरून सिंकवर सर्वत्र शिंपडा. अर्ध्या तासानंतर, ब्रशने स्वच्छ करा. सिंक चमकू लागेल.

हेही वाचा – Kitchen Hacks : गॅस शेगडी वापरताना तुम्ही ‘या’ चुका करता का? लायटर की काडेपेटी, काय वापरणे आहे सुरक्षित, जाणून घ्या

ओव्हन साफ करा
आजकाल प्रत्येक घरात ओव्हन वापरला जातो. ओव्हन पाण्याने साफ करता येत नाही. अशा स्थितीत ओव्हन कसे स्वच्छ करावे, असा प्रश्न पडतो. ओव्हन स्वच्छ करण्यासाठी, एक कप व्हाईट व्हिनेगर आणि पाणी मिसळा आणि काही वेळ ओव्हनमध्ये तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ कापडाने ओव्हन पुसून टाका. ओव्हनचा वास आणि चिकटपणा दोन्ही नाहीसे होतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-05-2023 at 19:25 IST

संबंधित बातम्या