Steps for Cleaning a stainless steel thermos : दिवसभरात अनेकदा गरम पाणी आणि चहा पिण्याची सवय असेल आपल्यापैकी बरेच जण थर्मॉस बाटलीचा वापर करतात. यामध्ये पाणी असो किंवा चहा बराच वेळ गरम राहू शकते. ऑफिसला जाताना, प्रवासाला जाताना किंवा बाहेर जाताना तुम्ही त्यात चहा किंवा कॉफीसुद्धा घेऊन जात असाल. त्यामुळे, त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा, थर्मॉसच्या बाटल्या फक्त दोन-चार वेळा पाण्याने धुतल्या जातात.
बाहेरून स्वच्छ दिसत असल्या तरीही हळूहळू त्यांच्या तळाशी, झाकणावर आणि रबर सीलवर नकळतपणे घाण साचत जाते. यामुळे काही दिवसांनी विचित्र वास येऊ शकतो. कधीकधी, पाण्याची चवसुद्धा बदलू शकते. अशा परिस्थितीत, फक्त थर्मॉस पाण्याने धुणे पुरेसे नाही. चला, थर्मॉस घरीच स्वच्छ करण्याची एक सोपी पद्धत जाणून घेऊया.
थर्मॉसला दुर्गंधी का येते?
धुतल्यानंतर थर्मॉसमध्ये ओलावा राहिल्यास आणि तो झाकण लावून ठेवल्यास, कालांतराने त्याला दुर्गंध येऊ शकतो. जर त्यात चहा, कॉफी, दूध किंवा इतर कोणतेही पेय ठेवले असेल, तर आतमध्ये एक पातळ थर आणि वास रेंगाळू शकतो. याव्यतिरिक्त, झाकणाखाली, रबर सीलमध्ये, स्ट्रॉमध्ये किंवा लहान छिद्रांमध्ये ओलावा आणि घाण लपून राहू शकते. त्यामुळे, जर दुर्गंधी येत असेल तर फक्त थर्मॉसमध्ये पाणी ओतून मग हलवून स्वच्छ करणे पुरेसे नाही.
थर्मॉस स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू
- व्हिनेगर
- बेकिंग सोडा
- सौम्य डिशवॉशिंग लिक्विड
- गरम किंवा कोमट पाणी
- बॉटल ब्रश
- मऊ कापड किंवा लहान ब्रश
व्हिनेगरने थर्मॉसमधील दुर्गंधी कशी दूर करावी?
जर तुमच्या थर्मॉसच्या आतून तीव्र दुर्गंधी येत असेल. तर तुम्ही तो पांढऱ्या व्हिनेगरने स्वच्छ करू शकता. प्रथम, थर्मॉस रिकामा करा आणि पाण्याने धुवा. नंतर, त्यात अर्धा कप व्हिनेगर आणि पाणी घाला. थर्मॉस बंद करा आणि हळूवारपणे हलवा. सुमारे १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर, ते द्रावण ओतून टाका. थर्मॉस स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवा. आतमध्ये काही साचले असल्यास, लांब बॉटल ब्रशने तळ आणि आतील भाग हळुवारपणे घासून घ्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळा धुवा.
बेकिंग सोडा
कधीकधी एखाद्या पेयाचा थर किंवा वास थर्मोसच्या आत राहतो. तो काढण्यासाठी हा उपाय करून पहा. प्रथम, थर्मोसमध्ये सुमारे १-२ चमचे बेकिंग सोडा टाका. नंतर, थोडे कोमट पाणी घालून पेस्ट बनवा. बॉटल ब्रशने आतील भाग आणि तळ हळुवारपणे घासून घ्या. काही मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवा.
लक्षात ठेवा की, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळण्याची गरज नाही. जरी त्यांना मिसळल्याने फेस तयार होईल.
थर्मोसचे झाकण आणि रबर सील
कधीकधी आपल्याला समजत नाही की, वास थर्मोसच्या आतून न येता झाकण आणि रबर सीलमधून येतो. जर थर्मॉसचे झाकण वेगवेगळ्या भागांमध्ये उघडत असेल. तर ते भाग वेगळे करून प्रत्येक भागाची स्वतंत्रपणे स्वच्छता करा. स्वच्छ करण्यासाठी, झाकण सौम्य डिशवॉशिंग लिक्विड आणि पाण्याने धुवा. रबर सीलच्या सभोवतालची घाण मऊ, लहान ब्रशने स्वच्छ करता येते. जर सील काढता येत असेल, तर ते काढून दोन्ही बाजू स्वच्छ करा. धुतल्यानंतर, हे भाग लगेच बंद करून थर्मोसमध्ये पुन्हा बसवू नका. आधी त्यांना पूर्णपणे सुकू द्या. जर रबर सीलला तडे गेले असतील, ते चिकट झाले असेल, किंवा बराच वेळ स्वच्छ करूनही त्याला सतत वास येत असेल, तर ते बदलण्याची आवश्यकता असू शकते.
