Tips to Clean Trolley Bag:प्रवासात ट्रॉली बॅग वापरणे ही सामान्य गोष्ट आहे. प्रवासाला जाताना ट्रॉली बॅग घेऊन जाणे हा बहुतेक लोकांसाठी आरामदायी पर्याय मानला जातो. मात्र, प्रवासादरम्यान ट्रॉली बॅग खूपच खराब आणि अस्वच्छ होते. ट्रॉली बॅग योग्यपद्धतीने स्वच्छ कशी करावी याबाबत बऱ्याच जणांना माहित नसते. जर तुमची ट्रॉली बॅगदेखील अस्वच्छ झाली असेल तर तुम्ही हे सोपे उपाय वापरून ती साफ करू शकता. तुमची ट्रॉली बॅग काही मिनिटांत नवीन असल्यासारखी चमकू लागेल.
मीठाने करा सफाई:
ट्रॉली बॅग साफ करण्यासाठी तुम्ही मीठ आणि गरम पाण्याचा वापर करू शकता. त्याच्यासाठी गरम पाण्यामध्ये मीठ टाका. आता या पाण्यात साफ कपडा भिजवा आणि मग ट्रॉली बॅग कपड्याने स्वच्छ पूसून घ्या. तुमची ट्रॉली बॅग चांगली चमकू लागेल.




डिटर्जेंटचा वापर करा:
ट्रॉली बॅग साफ करण्यासाठी डीटर्जेंट वापरणे देखील उपयुक्त होते. त्यासाठी पाण्यामध्ये डिटर्जेंट मिसळा. आता साफ कपडा या पाण्यात बुडवा आणि चांगला पिळून घ्या. आता ट्रॉली बॅग आतून-बाहेरून स्वच्छ पूसून घ्या. त्यानंतर ट्रॉली बॅगला स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा साफ करा आणि बॅग चांगली सुकवा.
हेही वाचा – टक…टक…टक! छताच्या पंख्याच्या आवाजामुळे वैतागला आहात? हे पाच सोपे उपाय ठरतील फायदेशीर
बेकिंग सोडा सर्वोत्तम होईल:
ट्रॉली बॅग स्वच्छ आणि डागरहित करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी 1 चमचे बेकिंग सोडामध्ये अर्धा चमचा टूथपेस्ट मिसळा. तुम्ही टूथपेस्टऐवजी नेल पॉलिश रिमूव्हर देखील वापरू शकता. आता हे मिश्रण ट्रॉली बॅगवरील डागांवर लावा आणि काही वेळाने स्वच्छ कापडाने पुसून टाका. यामुळे ट्रॉली बॅगवरील डाग लगेच नाहीसे होतील.
हेही वाचा – उन्हाळ्यात पाण्याची टाकी थंड कशी ठेवावी? फॉलो करा पाच सोपे उपाय
पांढरे व्हिनेगर वापरा :
अनेक दिवस ठेवल्यामुळे ट्रॉली बॅगला अनेकदा बुरशी लागते. अशावेळी ट्रॉली बॅग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पांढरे व्हिनेगर वापरू शकता. यासाठी ट्रॉली बॅग पांढऱ्या व्हिनेगरमध्ये भिजवलेल्या कापडाने पुसून घ्या. यामुळे तुमची बॅग नव्यासारखी दिसेल आणि दुर्गंधी मुक्त होईल
हेही वाचा – सँडविच बनवताना ब्रेड ओला होऊ नये म्हणून लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या Sandwich फ्रेश ठेवण्याचे ५ उपाय
वाइन वापरा :
ट्रॉली बॅगचा वापर न करणे आणि त्यांना बराच काळ कपाटात किंवा बंद जागेवर ठेवल्यामुळे अनेकदा ट्रॉली बॅगमध्ये बुरशी लागू शकते. अशावेळी तुम्ही हे साफ करण्यासाठी वाईन वापरु शकता. त्यासाठी वाईनमध्ये कपडा भिजवा आणि ट्रॉली बॅग साफ करा. ही ट्रॉली बॅग स्वच्छ करा.