scorecardresearch

Premium

पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या आतून कशा स्वच्छ करायच्या? जाणून घ्या ४ सोप्या टिप्स

Cleaning Hacks : प्लास्टिकच्या बाटल्या अनेकदा आतून नीट स्वच्छ करायच्या असा प्रश्न पडतो. यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हा या बाटल्या अगदी सहज स्वच्छ करु शकता.

how to clean water bottle at home bottle cleaning tips
पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या आतून कशा स्वच्छ करायच्या? जाणून घ्या ४ सोप्या टिप्स (photo – freepik)

आजकाल अनेकांच्या घरात विविध प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. तुमच्यापैकी अनेकजण जिमला जाताना, प्रवासात, ऑफिस, शाळा, कॉलेजला जाताना पाण्याची बाटली घेऊन जातात. पण सतत वापरून या बाटल्या अस्वच्छ होतात. परंतु बऱ्याच वेळा पाण्याच्या बाटलीचे तोंड लहान असल्याने त्या बाहेरुनचं स्वच्छ करता येतात. परंतु त्या आतून नीट स्वच्छ करता येत नसल्याने त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात. अशावेळी आम्ही तुम्हाला पाण्याची बाटल्या आतून स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

पाण्याची प्लास्टिकची बाटली आतून स्वच्छ करण्याच्या टिप्स

१) डिटर्जंट आणि गरम पाणी

दररोज वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्या तुम्ही डिटर्जंट आणि गरम पाण्याने नीट स्वच्छ करु शकता. जर पाण्याच्या बाटलीचे तोंड रुंद असेल तर तुम्ही स्पंजच्या साहाय्याने ते आतून स्वच्छ करु शकता, जर तुमच्याकडे इंसुलेटेड पाण्याची बाटली असेल तर ती तुम्ही गरम पाण्याने भरून १० मिनिटे तशी ठेवा, यामुळे त्यातीत बॅक्टेरिया मरतात.

how to remove shoe smell How to Clean Smelly Shoes Home Remedies for Removing Odor from Shoes
तुमच्याही शूजमधून खूप दुर्गंधी येतेय? मग ‘या’ टिप्स एकदा वापरुन पाहाच
heart attack right chest pain Know the signs and symptoms Warning Signs of a Heart Attack
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? मग असू शकते ‘हे’ हार्ट अटॅकचे लक्षण? वेळीच व्हा सावध अन् लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला
Kitchen Jugaad
Kitchen Jugaad : कांद्याची साल कचरा समजून चुकूनही फेकू नका, असा उपयोग करा अन् मिळवा अफलातून फायदे
Bathing Tips
आंघोळीच्या पाण्यात मिसळा फक्त ‘या’ दोन गोष्टी; दुर्गंधी तर दूर होईलच, पण तुमचा चेहराही उजळेल!

२) व्हिनेगर आणि गरम पाणी

साबण आणि पाण्याने धुतल्यानंतर बाटलीत एक चतुर्थांश व्हिनेगर घाला. आता त्यात गरम पाणी घालून वरपर्यंत भरा. बाटलीमध्ये हे द्रावण रात्रभर भरुन ठेवा आणि नंतर कंटेनर रिकामा करा. यानंतर बाटली स्वच्छ पाण्याने धुवा.

३) बेकिंग सोडा आणि गरम पाणी

बाटलीत दोन चमचे बेकिंग सोडा टाका आणि गरम पाणी घालून वरपर्यंत भरा. आता बाटलीचे झाकण बंद करुन नीट शेक करा. यानंतर झाकण काढा आणि काही तास असेच राहू द्या. यानंतर बाटली रिकामी करा आणि स्वच्छ पाण्याने धुवून बाजूला ठेवा.

४) ब्लीच आणि थंड पाणी

पाण्याच्या बाटलीतून येणारी दुर्गंधी आणि बॅक्टेरिया दूर करण्यासाठी ब्लीच आणि थंड पाणी ही एक चांगली पद्धत आहे. यासाठी बाटलीत एक चमचा बेकिंग सोडा आणि थंड पाणी टाका आणि रात्रभर ठेवा आणि सकाळी रिकामी करा, यानंतर डिटर्जंटने स्वच्छ करुन कोरडे करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to clean water bottle at home bottle cleaning tips sjr

First published on: 29-09-2023 at 18:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×