Helmet Cleaning Tricks : बाईक किंवा स्कूटीवरून प्रवास करताना सुरक्षेसाठी हेल्मेट घालणे अत्यंत आवश्यक असते. बरेच लोक हेल्मेट तर वापरतात; पण त्याच्या स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष करतात. जर हेल्मेट बरेच महिने स्वच्छ केले नाही, तर त्यात घाम, तेल व धूळ जमा होऊ लागते. त्यामुळे हेल्मेटमध्ये जीवाणू आणि बुरशीची वाढ होऊ शकते. अशा प्रकारचे हेल्मेट वापरल्याने केसांचे नुकसान होते, कधी कधी केसगळती होण्याची शक्यता आहे म्हणून हेल्मेट नियमितपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.

१) आतील फोम पॅडिंग काढा

हेल्मेटमधील फोम पॅडिंग घाम आणि घाण शोषून घेते. त्यासाठी प्रथम हेल्मेटच्या आतील भागातून फोम पॅडिंग काढा आणि हे पॅड बेबी शॅम्पू आणि पाण्यात तीन ते तास भिजवा. बेबी शॅम्पू सौम्य असतो, ज्याने घाम आणि तेलकटपणा सहज काढता येतो. तसेच तो जास्त फेसही सोडत नाही.

२) पॅडिंग स्वच्छ धुऊन सुकवा

काही तासांनंतर पॅडिंग स्वच्छ पाण्याने चांगले धुवा. हे पॅड पूर्णपणे कडक उन्हात सुकवा. त्यामुळे त्यात कोणताही ओलावा, वास किंवा बुरशी राहणार नाही.

३) संपूर्ण हेल्मेट पाण्यात बुडवू नका

संपूर्ण हेल्मेट पाण्यात बुडवून स्वच्छ करण्याची चुक करू नका. कारण- हेल्मेटच्या बाहेरील भाग खूप कठीण असतो, ज्यात पाणी अडकून बसू शकते. जर असे हेल्मेट आतून व्यवस्थित वाळले नाही, तर त्यात बुरशी, दुर्गंधी व जीवाणू निर्माण होऊ शकतात. मायक्रोफायबर कापडाने हेल्मेटची काच स्वच्छ करा. त्यासाठी काच काढून स्वच्छ करा.

कोमट पाण्याने किंचित भिजवलेल्या मायक्रोफायबर कापडाने काच पुसून घ्या. त्यामुळे धूळ, बोटांचे ठसे व डाग सहज निघून जातील आणि काचेवर ओरखडे पडणार नाहीत.

४) हेल्मेटचा बाहेर भाग करा स्वच्छ

हेल्मेटच्या बाहेरील बाजूस स्वच्छ करण्यासाठी किंचित ओलसर मायक्रोफायबर कापड वापरा. त्यामुळे हेल्मेटवरील धूळ, घाम सहज निघून जाईल. त्यानंतर हेल्मेट कोरड्या कापडाने पूर्णपणे पुसून काढा.

५) लहान भाग करा स्वच्छ

जर हेल्मेटमधील काही भाग काढता येण्याजोगे असतील, तर ते भाग काढून स्वच्छ करा. या भागांमध्येही अनेकदा धूळ जमा होते आणि हेल्मेट लवकर घाणेरडे दिसते.

६) शेवटी हेल्मेट पुन्हा जोडा

हेल्मेटचे सर्व भाग पूर्णपणे कोरडे झाल्यावर ते पुन्हा जोडा. स्वच्छ हेल्मेट केवळ दुर्गंधीच रोखत नाही, तर त्यामुळे केसगळती किंवा केसांचे कोणतेही नुकसान होत नाही,