Ramdev Baba’s advice on using Hirda for constipationबद्धकोष्ठता ही अशी एक समस्या आहे ज्यामध्ये मल आतड्यामध्ये कुजत राहतो आणि शौचाद्वारे शरीराबाहेर पडत नाही. आठवड्यातून तीन वेळेपेक्षा कमी वेळा मलप्रवृत्ती होणे म्हणजेच शौचास होणे, या स्थितीला वैद्यकीय भाषेत बद्धकोष्ठता म्हणतात. बद्धकोष्ठतेचा त्रास कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. या समस्येमुळे पचनसंस्था बिघडते आणि शरीरातून मल बाहेर पडणे कमी होते. हा मल आतड्यामध्येच सडत राहतो. बद्धकोष्ठतेमुळे तासनतास टॉयलेटमध्ये बसावे लागते, तरीही पोट साफ होत नाही. यामुळे मल कडक होतो आणि अनेकदा पोटात तसेच गुदद्वारात वेदना होण्याचा त्रास होतो.

दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा आजार राहिल्यामुळे भूक कमी लागते, छातीत जळजळ होते, पोटात जडपणा जाणवतो आणि मळमळ व उलट्यांचा त्रास होतो. अनेकदा तर आतड्यांमध्ये जखमा आणि सूजसुद्धा येते. मूळव्याध या आजाराचे मुख्य कारणही बद्धकोष्ठताच बनते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी आहाराची काळजी घेणे आणि भरपूर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी ‘हिरडा’ (हरड) याचे सेवन अत्यंत प्रभावी ठरते. हिरडा ही अशी एक औषधी वनस्पती आहे ज्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते आणि आतड्यामध्ये साचलेली मलही झटक्यात बाहेर काढते.. हिरड्याचे सेवन घशापासून ते मोठ्या आतड्यापर्यंत साचलेली घाण साफ करते.

चला तर मग तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की हिरड्याचे सेवन बद्धकोष्ठता कशी दूर करते आणि त्याचा वापर कसा करावा.

हिरड्याचे सेवन बद्धकोष्ठता कशी दूर करते (How Consumption of Haritaki Relieves Constipation)

हिरड्याचे सेवन केल्याने आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडते. हिरडा हा असा एक मसाला आणि वनस्पती आहे जो बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देईल. हिरड्याच्या सेवनाने उलट्या आणि मळमळीच्या त्रासापासूनही आराम मिळतो. हिरड्याचे सेवनामुळे पोट साफ होते आणि तोंडापासून ते गुदद्वारापर्यंतची सर्व घाण साफ करून शौचाद्वारे शरीराबाहेर काढून टाकते.

हिरड्याची पूड (पावडर) कशी बनवावी (How to Make Haritaki Powder)

हिरड्याला अनेक नावांनी ओळखले जाते. हे किराणा दुकानातून सहज विकत घेता येते. याची पूड बनवून याचे सेवन केले जाऊ शकते. हिरडा खूप कडक असतो, त्यामुळे तो दळणे किंवा बारीक करणे थोडे कठीण असते. तो बारीक करण्यासाठी एका लोखंडी कढईत थोडेसे गोडेतेल किंवा फक्त एक चमचा देशी तूप घालून तो भाजून घ्यावा. भाजताना तो सतत हलवत राहावा. भाजल्यानंतर जेव्हा हिरडा फुलेल, तेव्हा तो कढईतून बाहेर काढावा. तो थंड झाल्यावर दळून घ्यावा आणि हवाबंद डब्यात ठेवून द्यावा.

हिरड्याचे सेवन कसे करावे (How to Consume Haritaki)

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा हिरड्याची पूड टाकून ते चांगले ढवळून घ्यावे आणि त्याचे सेवन करावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात थोडे मीठही मिसळून पिऊ शकता. हिरड्याच्या पुडीचे सेवन केल्यानंतर अवघ्या २ तासांत तुमच्या पोटात कुजणारा मल शरीराबाहेर पडेल.

लक्षात ठेवा की याचे सेवन केल्यानंतर काही वेळ चालत राहावे, बसून राहू नये. अर्ध्या तासातच तुम्हाला शौचाचा वेग जाणवेल आणि दोन तासांत तुमचे पोट पूर्णपणे साफ होईल. नियमितपणे याचे सेवन केल्याने पचनसंस्थेत सुधारणा होते.