soaked almonds good for diabetic patients : सुका मेवा हा फक्त गोड पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी टाकला जात नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. बदाम हा सुका मेवा दीर्घकाळापासून पोषक तत्त्वांचा खजिना मानला जातो. कारण – बदाम आरोग्यदायी चरबी, प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वांनी समृद्ध असतात. पण, अनेकदा जीवनशैलीशी संबंधित समस्या असलेल्या मंडळींना त्यांच्या रोजच्या आहारात बदामांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी, आहारातील प्रत्येक पदार्थाचा रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एखादा पदार्थ खरोखरच फायदेशीर आहे की नाही हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

घरोघरी आणि अगदी पिढ्यान् पिढ्या चालत आलेली एक सामान्य प्रथा म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाणे. त्यामागील कल्पना अशी आहे की, बदाम भिजवल्यामुळे त्यातून जास्त पोषक तत्त्वे बाहेर पडण्यास मदत होऊन पचनक्रिया सोपी होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होऊ शकते. पण, ही गोष्ट मधुमेह असलेल्यांसाठी उपयुक्त आहे का? तर याचबद्दल आपण बातमीतून जाणून घेऊयात…

याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने कौन्सिल डाएटिशियन व मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, प्रीडायबेटीज किंवा टाईप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रोज रिकाम्या पोटी बदाम (भिजवलेले किंवा कच्चे) खाल्ल्याने रक्तातील साखर (Fasting Blood Glucose) किंवा HbA1c मध्ये सातत्यपूर्ण आणि लक्षणीय घट होत असल्याचे ठोस असे कोणतेही पुरावे नाहीत.

बदाम जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढणे कमी करण्यास मदत करू शकतात. विशेषतः जेव्हा ते कर्बोदकयुक्त जेवणाबरोबर किंवा जेवणापूर्वी पूर्वी खाल्ले जातात. जेव्हा नाश्त्यामध्ये बदाम खाल्ले जातात, तेव्हा त्याचा जेवणावर परिणाम (second-meal effect) दिसून येतो, ग्लुकोज सहनशीलतेत बिघाड असलेल्या प्रौढांमध्ये दुपारी जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि पोट भरल्याची भावना अधिक काळ टिकते. पण, ज्यांना दीर्घकाळापासून मधुमेह आहे, त्यांच्यासाठी जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याचे प्रमाण कमी असते.

अनेक क्लिनिकल अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, नाश्त्याबरोबर बदाम खाल्ल्यास जेवणावर (Second-Meal Effect) त्याचा परिणाम दिसू लागतो. म्हणजे दुपारच्या किंवा पुढील जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ तुलनेने कमी होते. ग्लुकोज सहनशीलतेत बिघाड (Impaired Glucose Tolerance / Prediabetes) असलेल्या प्रौढांमध्ये जेवणानंतरची रक्तातील साखर (Postprandial Blood Glucose) नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर पोट भरल्याची भावना (Satiety) अधिक काळ टिकते, त्यामुळे पुढील जेवणात जास्त खाण्याची शक्यता कमी होऊ शकते.

बदामातील पोषक तत्त्वे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन आणि इन्सुलिन संवेदनशीलतेला कशी मदत करतात?

बदामामध्ये मॅग्नेशियम, भरपूर फायबर आणि चांगल्या प्रकारची (आरोग्यदायी) चरबी असते. हे घटक शरीरातील इन्सुलिन अधिक प्रभावीपणे काम करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. मॅग्नेशियम शरीराला रक्तातील साखर (ग्लुकोज) पेशींमध्ये पोहोचवून तिचा योग्य वापर करण्यास मदत करतो. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल, तर मधुमेह नियंत्रणात ठेवणे अधिक कठीण होऊ शकते. तसेच, बदामातील फायबर अन्नातील कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) हळूहळू पचू देते. त्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही आणि तिची पातळी अधिक स्थिर राहण्यास मदत होते. बदामामध्ये आढळणारी मोनोअनसॅच्युरेटेड चरबी पोट भरल्याची भावना वाढवते, जी मधुमेहींमध्ये सुधारित इन्सुलिन संवेदनशीलता आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीशी आरोग्याशी संबंधित आहे.

दररोज भिजवलेले बदाम खाण्याचे धोके

बदाम हा भरपूर ऊर्जा देणारा सुका मेवा आहे. त्यामुळे दररोज सुमारे ३० ते ४० ग्रॅम (५ ते १० भिजवलेले बदाम) सेवन करण्याची शिफारस केली जाते. अतिरिक्त प्रमाणामुळे एकूण उष्मांकाचे प्रमाण वाढू शकते आणि जर आहारातील इतर बदलांनी ते संतुलित केले नाही, तर वजन वाढण्याची शक्यता असते. बदामांचा मधुमेहाच्या नेहमीच्या औषधांवर कोणताही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आलेले नाही. पण, त्यांचा आहारात…