Onion: कांदा हा स्वयंपाकघरातील असा घटक आहे, जो अनेक पाककृतीची चव वाढवतो. बहुमुखी भाजी म्हणून कांद्याची एक विशेष ओळख आहे. नाश्त्यापासून जेवणापर्यंतच्या अनेक पदार्थांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. याशिवाय सॅलेडमध्येही कच्चा कांदा खाल्ला जातो. पण, कांदा परतून खावा की कच्चा? कांदा खाण्याची योग्य पद्धत कोणती? चला तर जाणून घेऊ या.
कांदा परतून खावा की कच्चा?
कांदा हा खरं तर दोन पद्धतीने खाल्ला जातो. कांद्याला परतून खाऊ शकता किंवा कच्चाही खाऊ शकता. खाण्याची पद्धत ही आवडी-निवडीवर अवलंबून असते. आवडीनुसार आणि पदार्थांनुसार कांदा खाण्याची वेगवेगळी पद्धत असू शकते. कांद्यामध्ये सल्फर कंपाऊंड असते, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे कांदा परतून खाण्यापेक्षा कच्चा खाणे अधिक चांगले आहे.
जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा एक प्रक्रिया घडून येते, ज्यामुळे सल्फर कंपाऊंड निर्माण होतो आणि यामुळे कांदा कापताना आपल्या डोळ्यात पाणी येते. याशिवाय सल्फर कंपाऊंडमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि स्ट्रोकसह हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
हेही वाचा : भारतातील दहा सर्वात सामान्य नावं; तुमचे नाव यात आहे का?
कच्चा कांदा खाण्याचे दुष्परिणाम
कांदा परतून खाण्यापेक्षा कच्चा खाणे जास्त फायदेशीर असते. पण, अति प्रमाणात कच्चा कांदा खाऊ नये, कारण याचे दुष्परिणामही दिसू शकतात. तोंडाची दुर्गंधी येणे, छातीत जळजळ होणे, अॅसिडीटीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन आहारात कांद्याचे प्रमाण किती असावे, हे जाणून घ्यावे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)