Cockroach Home Remedy: घर एखाद्या सामान्य माणसाचं असो किंवा बॉलिवूड सुपरस्टारचं, स्वयंपाकघरातील “न बोलावता आलेले पाहुणे” म्हणजेच झुरळं आणि लाल मुंग्या त्या येतातच! जेवण कितीही चविष्ट बनवलं असलं, तरी सिंकजवळ एखादं झुरळ किंवा मुंग्यांची रांग दिसली की सगळा मूड खराब होतो.
पण घाबरू नका! बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि लेखिका-अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्या घरातही या समस्येवर एक अतिशय सोपा आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे.
काय-काय सामान लागेल?
हा खास स्प्रे बनवण्यासाठी तुम्हाला बाजारातून कोणतंही वेगळं सामान आणण्याची गरज नाही. तुमच्या मसाल्याच्या डब्यातील सामानातूनच हा स्प्रे तयार होईल:
लवंग (Cloves): ८ ते १० दाणे
तमालपत्र (Bay leaves): २ ते ३
पाणी: १ कप
पांढरं व्हिनेगर (Vinegar): १ कप
हा घरगुती स्प्रे कसा बनवायचा? (Step-by-Step Method)
सर्वात आधी ८-१० लवंगा आणि २-३ तमालपत्र घेऊन ते थोडं कुटून घ्या, जेणेकरून त्यांचा तीव्र वास बाहेर येईल.
त्यानंतर एका भांड्यात १ कप पाणी आणि १ कप व्हिनेगर घ्या. त्यामध्ये कुटलेली लवंग आणि तमालपत्र टाकून ते उकळायला ठेवा.
मिश्रण चांगलं उकळल्यानंतर आणि मसाल्यांचा अर्क पाण्यात उतरल्यावर गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या.
आता हे मिश्रण गाळून घ्या, जेणेकरून तमालपत्र आणि लवंगेचे तुकडे वेगळे होतील.
गाळलेलं हे पाणी एका रिकाम्या स्प्रे बाटलीत भरून घ्या.
हा घरगुती उपाय काम कसा करतो?
झुरळं आणि लाल मुंग्यांची वास घेण्याची क्षमता खूप तीव्र असते. तमालपत्र आणि लवंगेचा तीव्र वास त्यांना अजिबात आवडत नाही. त्याचबरोबर व्हिनेगर पृष्ठभाग स्वच्छ करण्यास मदत करतं आणि मुंग्या ज्या वासाच्या खुणेच्या आधारे एकमेकींच्या मागे चालतात, तो मार्गही पुसून टाकतो.
वापरण्याची योग्य पद्धत
ट्विंकल यांनी सांगितलं की, रात्री स्वयंपाकघरातील काम आटोपल्यानंतर ड्रॉवर आणि कॅबिनेटच्या कोपऱ्यांमध्ये हा स्प्रे शिंपडा. कपाटांचे कोपरे, किचनचा ओटा आणि ज्या ठिकाणी झुरळं किंवा मुंग्या जास्त येतात, तिथे या नैसर्गिक स्प्रेचा वापर करा. रात्रीच्या वेळीही कोणताही कीटक तिथे येणार नाही.
ना कोणत्याही केमिकलचा धोका, ना आरोग्याला नुकसान! हा उपाय फक्त पूर्णपणे सुरक्षितच नाही, तर तुमचे पैसेही वाचवतो. मग उशीर कशाला? आजच हा उपाय तुमच्या स्वयंपाकघरात करून पाहा आणि या बिन बोलावलेल्या पाहुण्यांना कायमचा टाटा-बाय-बाय करा!
