scorecardresearch

Premium

हिवाळ्यात कोरड्या ओठांचा त्रास होतय? तर ‘हे’ घरगुती उपाय करून ओठांना करा मऊ आणि गुलाबी

थंड हवामानात ओठांना मुलायम आणि गुलाबी होण्यासाठी ओठांची विशेष काळजी घ्यावी लागते.

जास्त पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.(photo credit: file photo)
जास्त पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.(photo credit: file photo)

हिवाळ्यात थंड वारे त्वचेतील सर्व आर्द्रता काढून घेतात आणि त्वचा खूप कोरडी होते. थंड वाऱ्याचा जास्तीत जास्त प्रभाव ओठांवर दिसतो. हिवाळ्यात ओठ कोरडे आणि खवले होतात. ओठांवर कोरडेपणा इतका वाढू लागतो की कधी कधी ओठातून रक्तही येऊ लागते. हिवाळ्यात ओठ फाटण्याचे कारण म्हणजे शरीरात ओलावा नसणे, त्यामुळे ओठ कोरडे आणि तडकायला लागतात.

थंडी हवामानात ओठांना मुलायम आणि गुलाबी होण्यासाठी ओठांची विशेष काळजी घ्यावी लागते. या ऋतूमध्ये ओठांवर केमिकल बेस मॉइश्चरायझर लावल्याने काही काळासाठी ओठांचा कोरडेपणा दूर करतात, त्यानंतर ओठ पुन्हा कोरडे होतात. जर तुम्हाला हिवाळ्यात कोरड्या ओठांचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करा, तुमचे ओठ मऊ गुलाबी आणि मुलायम राहतील.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

नाभीत तेल टाकणे

हिवाळ्यात ओठ जास्त कोरडे पडत असतील तर रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीत मोहरीचे तेल लावावे. नाभी हे आपल्या शरीराचे केंद्र मानले जाते, ज्यामध्ये तेल लावल्याने अनेक समस्या दूर होतात. रोज नाभीत तेल लावल्याने ओठ मऊ आणि गुलाबी राहतील.

ओठांवर मलाई लावा

जर तुम्हाला ओठ तडकण्याचा त्रास होत असेल तर दररोज ओठांवर मलई आणि हळद लावा. चमच्याने क्रीम घेऊन त्यात चिमूटभर हळद मिसळून लावल्याने ओठ तडकण्याची समस्या दूर होईल.

ओठांवर देशी तूप लावा

हिवाळ्यात होत कोरडे पडतात. ओठ कोरडे पडल्यावर तडकतात त्यामुळे याचा त्रास होतो. ही समस्या दूर करण्यासाठी ओठांवर देसी तूप लावा. देसी तूप ओठांना मॉइश्चरायझ करेल, तसेच त्वचेला ग्लो आणेल.

गुलाबाची पाने कोरडेपणा दूर करतात

हिवाळ्यात ओठ कोरडे पडत असतील तर ओठांवर ओलावा आणण्यासाठी गुलाबाची पाने वापरा. गुलाबाची पाने पाण्यात भिजवून रोज ओठांवर लावा, तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी होतील.

खूप पाणी प्या

हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने ओठांमध्ये कोरडेपणा वाढतो, ज्यामुळे ओठ कोरडे आणि ओठांना भेगा पडतात. हिवाळ्यातही किमान एक ते दोन लिटर पाणी प्यावे. जास्त पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.

फुटलेल्या ओठांवर पांढरे लोणी लावा

रात्री झोपण्यापूर्वी कोरड्या ओठांवर पांढरे लोणी लावा. पांढरे लोणी लावल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते आणि ओठ गुलाबी आणि मऊ राहतात.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2022 at 15:45 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×