scorecardresearch

Premium

सकाळी लवकर उठायची सवय कशी लावायची? ‘या’ तीन टिप्स ठरतील फायदेशीर

काही लोकांना सकाळी लवकर उठावसं वाटतं, पण खूप प्रयत्न करूनही त्यांना सकाळी लवकर उठणे शक्य होत नाही. तुम्हालाही सकाळी उठायची सवय लावायची असेल तर फक्त तीन कामं करा. या तीन टिप्सच्या मदतीने तुम्हाला दररोज सकाळी लवकर उठण्याची सवय लागू शकते.

three tips help you to make habit of getting up early
सकाळी लवकर उठायची सवय कशी लावायची? (Photo – Freepik)

How to get up early in the morning : सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी लवकर उठल्यामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. काही लोकांना सकाळी लवकर उठावसं वाटतं, पण खूप प्रयत्न करूनही त्यांना सकाळी लवकर उठणे शक्य होत नाही. तुम्हालाही सकाळी उठायची सवय लावायची असेल तर फक्त तीन कामं करा. या तीन टिप्सच्या मदतीने तुम्हाला दररोज सकाळी लवकर उठण्याची सवय लागू शकते.

  • सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्ही पहाटे ४ किंवा ५ वाजता अलार्म लावत असाल तर ही सवय सोडून द्या. याऐवजी रात्री ९ वाजता अलार्म लावा. ९ वाजेपर्यंत सर्व कामे पूर्ण करून बेडवर झोपायला जा.
    सुरुवातीला काही दिवस तुम्हाला ९ वाजता झोप येणार नाही, पण काही दिवसांनंतर तुम्हाला ९ वाजता झोप येणार, ज्यामुळे कोणताही अलार्म न लावता तुम्हाला सकाळी ४ किंवा ५ वाजता जाग येऊ शकते. ९ वाजता झोपताना स्वत:ला टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपपासून दूर ठेवा; ज्यामुळे तुम्हाला वेळेवर झोपणे सोपे जाईल.

हेही वाचा : Jugaad Video : काय सांगता! टूथपेस्टनी नेल पॉलिश काढता येते; हा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Traffic Rules
Money Mantra : ट्रॅफिक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने चलान कापले, तर घर बसल्या रद्द करू शकता दंड अन् वाचवू शकता पैसे; ‘ही’ आहे तक्रारीची सोपी प्रक्रिया
traffic police
ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं तर काय कराल? ‘या’ नऊ टिप्स कायम लक्षात ठेवा
Step by step guide to make round chapati or gol roti how to make perfect soft round gol roti poli
काही केल्या पोळ्या गोल होत नाहीत? ‘या’ ४ सोप्या टिप्स करा फॉलो; पोळ्या होतील मऊ, फुगीर!
When is a right time to check weight
वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की रात्री? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
  • सकाळी उठण्यासाठी ध्येय असणे अत्यंत आवश्यक आहे. उदा. सकाळी उठून तुम्हाला व्यायाम करायचा आहे, अभ्यास करायचा आहे किंवा नवीन काहीतरी शिकायचं आहे; इत्यादी गोष्टींमुळे तुम्ही सकाळी लवकर उठण्यासाठी स्वत:ला प्रेरित करू शकता.
  • वजन कमी करण्यासाठी रात्री कमी खावे, असे तुम्ही अनेकदा वाचले किंवा ऐकले असेल. सकाळी लवकर उठण्यासाठीसुद्धा हा नियम लागू होतो. रात्री भरपूर जेवण केल्यामुळे अन्न पचवायला वेळ लागतो, ज्यामुळे रात्री लवकर झोप येत नाही. अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला सकाळी उशिरा उठावसं वाटू शकते. त्यामुळे रात्री खूप कमी खाण्याचा प्रयत्न करावा.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to get up early in the morning three tips help you to make habit of getting up early ndj

First published on: 02-10-2023 at 16:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×