Growing Curry Leaves: भारतीय स्वयंपाकघरात तुम्हाला कढीपत्ता सहज दिसेल. त्याचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. त्यामुळे जेवणाची चव दुप्पट होते. म्हणूनच लोक त्याचा अधिकाधिक वापर करतात. पण कधी कधी बाजारात मिळत नाही किंवा घरात आणलेला कढीपत्ता ऐनवेळी संपतो. त्यामुळे लोकांना बराच वेळ बाजारपेठेत चकरा माराव्या लागतात किंवा ऐनवेळी फक्त कढीपत्यासाठी धावपळ करावी लागते. जर तुम्हालाही कढीपत्त्यशिवाय स्वयंपाक अपूर्ण वाटत असेल आणि तुमचे जेवण चविष्ट बनवायचे असेल तर आता तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. फक्त या सोप्या टिप्सचे वापरून तुम्ही तुमच्या घरात कढीपत्ता वाढवा.

हेही वाचा – नव्या कपड्यांवर डाग पडला आहे का? मग बर्फ वापरा, चुटकीसरशी गायब होईल डाग; पाहा व्हायरल व्हिडीओ

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

घरीच उगवा कढीपत्ता | How to Grow Curry Leaves

एक कुंडीमध्ये माती घ्या आणि त्यात कढीपत्ता बी घाला.
मातीला पुरेश्या प्रमाणात पाणी घाला, पण पाण्याचे प्रमाण जास्त नसावे हे लक्षात ठेवा.
त्या कुंडीत दररोज किमान ६तास सूर्यप्रकाश मिळायला हवा.
वाढत्या रोपाच्या चांगल्या विकासासाठी वेळोवेळी रोपांची छाटणी करत रहा.
सुमारे १ वर्षानंतर भांडे बदला. यावेळी लक्षात ठेवा भांड्याचा आकार रोपानुसार मोठा असावा.
कढीपत्ता पूर्णपणे तयार होईपर्यंत एक किंवा दोन वर्षे झाडावरून तोडू नका.
जेव्हा कढीपत्ता झाडाला पूर्ण पाने असतात, तेव्हा ते कुंडीतून बाहेर काढा आणि जमिनीत लावा.
अशा प्रकारे कढीपत्ता आता वापरासाठी तयार आहे.
तुम्ही त्याची पाने रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पावडर बनवूनही वापरू शकता.

Story img Loader