पावसाळ्यात हातात मस्त वाफाळत्या चहाचा कप मिळाला की मग सुख म्हणजे आणखी काही नको असं म्हणता येईल. आणि त्यात या चहात आलं घातलेलं असेल तर मग सोन्याहून पिवळं! चहा मध्ये किंवा जेवणातही आल्याचा फ्लेव्हर एक वेगळाच टच देऊन जातो. फक्त चवीपुरतं नाही तर हे आलं आपल्यासोबत आरोग्यकारी गुणही घेऊन येतं. त्यामुळे अनेकदा बाकीची भाजी घेताना सोबत भांडून फ्री मध्ये आणलेलं का होईना सर्वच किचन मध्ये आलं हे असतंच. पण तुम्हाला माहितेय का या आल्यासाठी वाद घालत बसण्यापेक्षा आपण आपल्या घरच्या कुंडीत सुद्धा आल्याची लागवड करू शकता. यासाठी खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरी आल्याची लागवड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला माती आणि खत आणावं लागेल. आपल्या घरातील जुन्या कुंडीतून थोडी माती उकरून घेतली तरी काम होऊ शकेल. आपल्याला आता ५० % माती व प्रत्येकी २५% नारळाच्या शेंड्या व खत घालून एक बेस तयार करायचा आहे. जर आपण घरीच ओल्या कचऱ्यातून खत तयार केले तर उत्तम अन्यथा बाजारातही अगदी स्वस्त दरात आपल्याला खत मिळू शकते. याशिवाय आपल्याला एक मोठी कुंडी लागेल.

Farming Hacks: एका लागवडीत 50 वर्ष उत्पादन देणारा बदाम, महाराष्ट्रातही विकसित होत आहेत ‘या’ प्रजाती

लक्षात ठेवा आपण आलं मातीत टाकताना थोडं जुनं असेल याची खात्री करा ज्याला कोंब असतील असं आलं चटकन मातीत मूळ पसरू शकेल. आधी कुंडीत थोडी माती घेऊन मग त्यात आल्याचा तुकडा ठेवायचा आहे, यात आल्याचे कोंब वरच्या दिशेने तोंड करून ठेवा व त्यावर माती पसरवून स्प्रेने पाणी टाका.

मातीतून आल्याचे अंकुर येण्यासाठी साधारण २ ते ४ आठवडे लागतात तोवर नियमित पाणी देत रहा. आल्याला फार पाण्याची गरज नसते त्यामुळे आपल्याला केवळ माती ओलसर होईल इतकेच पाणी टाकायचे आहे.

Monsoon Recipes: पावसाळ्यात ‘या’ रानभाज्यांचा बेत होऊदे! Viral Couple ‘प्रसिका’ ने सुद्धा शेअर केला Video, पहा

महत्त्वाची टीप: आल्याला फार उन्हाची गरज नसते त्यामुळे केवळ सकाळच्या कोवळ्या उन द्या व नंतर ही कुंडी सावलीत आणून ठेवा.

एक दीड महिन्याने आपल्याला माती थोडी हलकी मोकळी करून त्यात खत घालायचे आहे. पूर्णपणे तयार आल्याची पाने पिवळसर होतात त्यावेळेस मातीतील आल्याचे मूळ आपण उकरून काढू शकता. यासाठी साधारण ६ महिन्याचा अवधी लागतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to grow ginger at home in easy steps home garden svs
First published on: 07-08-2022 at 18:37 IST