scorecardresearch

तुम्ही पण केमिकल चहा पीत नाही ना? अशा प्रकारे घरी बसून चहाच्या पानांची करा शुद्धता

चहाचे मूल्य त्याच्या पानांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

lifestyle
चहाच्या पानाचा आकार आणि रंग नेहमी तपासला पाहिजे.(photo: jansatta)

चहा सर्वांनाच आवडतो. थंडीच्या दिवसात गरमागरम चहा मिळाला तर काय बोलावे? चहाचे सर्व प्रकार भारतात आढळतात, जसे की काळा चहा, मसाला चहा, लिंबू चहा इ. तसेच शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण ग्रीन टीचे सेवन करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही जी चहा पावडर चहा बनवताना वापरत आहात त्यात भेसळ नाही? तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवणारे कोणतेही हानिकारक रसायन किंवा इतर कोणतीही वस्तू त्यात आढळते का?

अलीकडेच टी बोर्ड इंडियाने भेसळयुक्त चहाच्या पानांबाबत लोकांना सतर्क केले आहे. केमिकलने रंगवलेली चहाची पाने बाजारात सर्रास आढळून आल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. चहाची पाने तयार करताना कधीकधी कृत्रिम रंग वापरले जातात, जे आरोग्यासाठी चांगले नाहीत. चहाच्या पानांना रंग आणि चमक देण्यासाठी बिस्मार्क ब्राउन, पोटॅशियम ब्लू, हळद, इंडिगो इत्यादींचा वापर केला जात असल्याच्याही माहिती समोर आली आहे. एकंदरीतच चहाच्या पानांमध्ये भेसळ होण्याची समस्या अत्यंत गंभीर असून आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही धोकादायक आहे. टी बोर्डाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नियमांचा अहवाल देत म्हटले आहे की कोणतेही उत्पादन विदेशी रंग आणि हानिकारक पदार्थांपासून मुक्त असले पाहिजे.

चहाच्या पानातील भेसळ कशी ओळखावी?

मुंबईच्या भाटिया हॉस्पिटलच्या आहारतज्ञ सकिना दिवाण सांगतात की, चहाचे मूल्य त्याच्या पानांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. चहा पावडर विकत घेतल्यावर ती बघून वास घेतल्यावरच त्याची गुणवत्ता थोडक्यात ओळखता येते. डॉ.सकीना यांच्या मते, चहाच्या पानाचा आकार आणि रंग नेहमी तपासला पाहिजे. हाताने तोडलेली पाने चांगली असतात कारण ती तुटत नाहीत आणि त्यांचा आकार टिकवून ठेवतात. चहा बनवल्यानंतर, चहाचा रंग चमकदार लाल आणि सोनेरी असल्याची खात्री करा. जर ते गडद तपकिरी झाले तर पानांचा दर्जा चांगला नाही.

FSSAI ने दिल्या टिप्स

चहाच्या पानांमध्ये भेसळ झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) देखील सतर्क झाले आहे. संस्थेने घरी चहाच्या पानांचा दर्जा तपासण्यासाठी टिप्स दिल्या आहेत. ज्याद्वारे तुम्ही पीत असलेला चहा भेसळयुक्त आहे की नाही हे तुम्ही सहज शोधू शकता.

घरी अश्या पद्धतीने तपासा चहा पावडर

सर्व प्रथम एक फिल्टर पेपर घ्या आणि त्यावर चहाची पाने पसरवा. फिल्टर पेपर ओला करण्यासाठी थोडे पाणी घाला. थोड्या वेळाने कागद नळाच्या पाण्याखाली ठेवून धुवा. आता फिल्टर पेपरवरील डाग उजेडात उलटे ठेवून पहा. चहाच्या पानांमध्ये भेसळ नसल्यामुळे फिल्टर पेपरवर कोणताही डाग पडणार नाही. तर भेसळयुक्त चहाची पाने कागदावर गडद तपकिरी डाग सोडतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2021 at 18:23 IST

संबंधित बातम्या