How To Identify Fake Or Real Paneer : पनीर म्हंटल की, आपल्यातील अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पनीर फक्त चविष्टच नाही तर पोषक तत्वांनीही समृद्ध असे. पण, अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन (FSDA) कडून तपासणी दरम्यान बाजारात अनेकदा भेसळयुक्त पनीर देखील आढळून आले आहे. FSDA अधिकाऱ्यांच्या मते, बनावट पनीर दुधाऐवजी युरिया, डिटर्जंट्स, कृत्रिम रसायने आणि पाम तेलापासून बनवले जाते.

एवढेच नाही तर पनीर चमकदार दिसावं म्हणून टिनोपल आणि आळा (आळाची पूड) यांची सुद्धा भेसळ केली जाते. ही दोन्ही रासायनिक संयुगे आहेत आणि कपड्यांना ब्लीच करण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या मते अशा चीजचे सेवन केल्यास पनीर हळूहळू शरीरासाठी विष म्हणून काम करते. ही रसायने अन्ननलिकेद्वारे आतड्यांपर्यंत पोहोचतात आणि नंतर रक्तात मिसळतात. यामुळे यकृत, मूत्रपिंडात समस्या निर्माण होऊ शकतात.

म्हणून, बनावट पनीर टाळण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करा…

१. पाण्यात बुडवून बघा – खऱ्या पनीरला स्पर्श करताच तो हाताला प्रचंड मऊ लागतो, त्याला दुधासारखा वास येतो. तसेच त्याचा एक छोटासा तुकडा पाण्यात ठेवला की, तरंगतो. पण, याउलट बनावट पनीर रबरासारखं दिसतो. त्याला रसायनांसारखा वास येतो. पाण्यात या बनावट पनीरचा छोटासा तुकडा जरी टाकला तरीही तो लगेच बुडून जातो.

२. हातावर घासा, दाबून बघा – जेव्हा बनावट पनीर हातावर घासल्यावर रबरासारखे वाटतो, दाबल्यावर चिकट आणि प्लास्टिकसारखा वर येतो. पनीर जरी तुम्ही गरम पाण्यात ठेवताच त्याचा कुस्करा होतो आणि पाण्यावर तेलकट किंवा चिकट थर देखील तयार होतो.

३. आयोडीनची चाचणी – जर तुम्हाला पनीर खाण्यापूर्वी त्याची चाचणी करायची असेल, तर तुम्ही आयोडीन वापरू शकता. आयोडीन कोणत्याही फार्मसीमध्ये उपलब्ध असते . जेव्हा आयोडीन पनीरवर लावले जाते तेव्हा खरे चीज अबाधित राहते. पण, बनावट पनीरसह ही प्रक्रिया केल्यास त्याचा रंग निळा किंवा काळ्या रंगामध्ये बदलेल. बनावट पनीरमध्ये स्टार्च असते, ज्यामुळे रंग बदलतो.