मध आरोग्यासाठी अनेक पद्धतीने गुणकारी मानले जाते. यामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्त्व आढळतात. हिवाळ्यात मध जास्त प्रमाणात वापरले जाते. हिवाळ्यात होणाऱ्या वायरल इन्फेकशन्सपासून वाचण्यासाठी मध मदत करते. पण आजकाल बाजारात उपलब्ध होणारे मध शुद्ध आहे की नाही असा प्रश्न पडतो, कारण अनेकवेळा मधाची चव, रंग वेगळे असल्याचे जाणवते. भेसळयुक्त मध खाल्ल्याने काही आजारांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे जर तुम्हालाही विकत घेत असलेले मध शुद्ध आहे की नाही असा प्रश्न पडला असेल, तर ते ओळखण्याची सोप्या पद्धती जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुद्ध मध आणि भेसळयुक्त मध यांमधील फरक असा ओळखा

आणखी वाचा : अति दूध प्यायल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम; जाणून घ्या याचे योग्य प्रमाण

पाणी
पाण्याने मधाची शुद्धता तपासणे हा लोकप्रिय मार्ग आहे. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये मधाची बारीक धार सोडा, जर पाण्यात मध मिसाळले तर याचा अर्थ ते भेसळयुक्त आहे आणि जर ग्लासच्या तळाशी जमा झाले, तर ते शुद्ध मध आहे असे समजावे.

वातावरणातील बदलानुसार दिसणारा फरक
हिवाळ्यात मध अधिक घट्ट होते, तर उन्हाळ्यात ते वितळते. वातावरणातील बदलानुसार हा फरक दिसत नसेल तर याचा अर्थ मध भेसळयुक्त आहे.

आणखी वाचा : हिवाळ्यात भाज्या लगेच खराब होत आहेत का? जास्त काळ ताज्या राहाव्या यासाठी वापरा ‘या’ टिप्स

पांढऱ्या कपड्यावरील डाग
एखाद्या पांढऱ्या कपड्यावर थोडे मध लावा आणि थोड्या वेळाने ते पाण्याने धुवून टाका. शुद्ध मधाचा डाग राहत नाही, जर कपड्यावर डाग राहिला तर याचा अर्थ ते भेसळयुक्त मध आहे.

अशाप्रकारे तुम्ही भेसळयुक्त मध आणि शुद्ध मध यातला फरक ओळखू शकता. भेसळयुक्त मध खाल्ल्याने अपचन होण्याची तसेच पोटदुखी होण्याची शक्यता असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to identify real and fake honey know simple ways to recognize it pns
First published on: 02-12-2022 at 09:29 IST