How To Increase Hair Length: भारत हा असा देश आहे जिथे जितके प्रगत तितकेच जुनाट विचारही एकत्र राहतात. काही विचार तर इतके बहुसंख्यांक असतात की त्यांचे कधी नियम बनतात हे ही कळत नाही. यातील काही विचारांना विज्ञानाचा आधार असतो काहींना नसतो पण यातील प्रत्येक विचार वजा नियम हा शास्त्र असतं ते असं म्हणून पाळला जातो. सौंदर्यापासून खाण्यापर्यंत अनेक विषयात अनेक नियम आहेत यातीलच एक नियम आपण घरून किंवा अगदी पार्लरवाल्या बाईकडूनही ऐकला असेल. तुम्हाला जर तुमचे केस वाढवायचे असतील तर दर काही वेळच्या अंतराने केस कापणे महत्त्वाचे आहे असं तुम्हीही ऐकून असाल. आज याच नियमामागील खरं काय आहे हे आपण डॉ. जयश्री शरद यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

डॉ. जयश्री यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, केस वाढवण्यासाठी सतत केस कापणे हा उपाय म्हणजे खरोखरच खूप मोठा गैरसमज आहे. त्या म्हणतात की तुमच्या केसांच्या मुळाला वगळता जी काही केसाची लांबी असते ती निर्जीव असते. म्हणजेच कधी जर तुमचा केस अर्ध्यातून कापला तर दुखतं का? पण तेच मुळापासून एखादा केस खेचला गेला तर वेदना होतात. यावरून हे लक्षात येते की तुम्ही केसाची लांबी कमी जास्त केली तरी त्याचा मुळावर काहीच परिणाम होत नाही आणि म्हणूनच केस वाढणे किंवा गळणे हे तुमच्या हेअरकटवर अवलंबून नसतेच.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Change your morning habits will help in achieving success
Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी
Upvas special naivedya special batata bhaji
बटाटयांची सुकी भाजी; नैवेद्याच्या पानावर वाढली जाणारी बटाटा भाजी एकदा नक्की ट्राय करा
Tea and Weight Gain
रोज १ कप चहा प्यायल्याने खरंच वजन वाढतं का? पोषणतज्ज्ञांनी सोडवला वाद

केस लांब कसे वाढवावेत? (How To Grow Hair Fast)

डॉ. जयश्री यांच्या माहितीनुसार, केसाच्या आरोग्यासाठी तुम्हाला उत्तम प्रथिने, अमिनो ऍसिड, व्हिटॅमिन व खनिजांनी समृद्ध आहार घ्यायला हवा. सर्वात मुख्य म्हणजे ताण- तणाव दूर ठेवा , ताणाचा सरळ प्रभाव तुमच्या टाळूवर होतो परिणामी केसाची वाढ सुद्धा खुंटते. अनेकदा तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा केसाची लांबी वाढण्यास अडथळा येऊ शकतो.

हे ही वाचा<< Video: कढईत भाजीचे मसाले करपून चिटकतात? तेलासह ‘ही’ एक गोष्ट परतून मिळवा कायमचा उपाय

केसवाढीचे गोल्डन रुल (Hair Growth Golden Rules)

डॉ. जयश्री यांनी केसवाढीसाठी काही गोल्डन नियम सांगितले आहेत. वारंवार केसावर केमिकल युक्त ट्रीटमेंट करणे टाळा. केसावर गरम पाणी, हवा, स्ट्रेटनर, हेअर ड्रायर याचा वापर करणे टाळा. केसाची लांबी ही अनुवांशिकतेवर सुद्धा अवलंबून असते. थोडक्यात केस कापल्याने केसाच्या लांबीवर फार परिणाम होत नाही पण तुमच्या केसाचे स्प्लिट्स एंड्स कमी होण्यास व लुक बदलण्यास नक्कीच मदत होऊ शकते