How to lose belly fat : सध्या या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, पौष्टिक आहाराची कमतरता यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. वजन वाढ व पोटवाढीची समस्या तर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तुमचे सुद्धा पोट सुटले का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेक वाढलेले पोट कसे कमी करावे, यासाठी आपण अनेक उपाय करतो पण काहीही फायदा होत नाही. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुटलेले पोट कसे कमी करावे यासाठी काही व्यायाम सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : Eggs For Winter Skincare : हिवाळ्यात त्वचेसाठी अंड्याचा करा उपयोग आणि त्वचेची घ्या काळजी; वाचा, ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे

Estimated tax evasion of 25 thousand crores 18 thousand fake companies busted by GST authorities print eco news
तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
black hole triple system
शास्त्रज्ञांनी लावला पहिल्या ‘ब्लॅक होल ट्रिपल’चा शोध; यातून नेमकं काय उलगडणार?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Vice President Jagdeep Dhankar
Vice President Jagdeep Dhankar: उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा सरकारला घरचा आहेर; शेतकरी आंदोलनावरून कृषी मंत्र्यांना सुनावलं
Major changes in Mumbais traffic for swearing-in ceremony
शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
security breach at bangladesh assistant high commission in agartala
भारतबांगलादेश तणावात भर; आगरतळ्यातील उच्चायुक्तालयात आंदोलकांचा धुडगूस, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत नाराजी
Baba Siddiqui murder case Lawrence Bishnoi gang key goon suspected of involvement Mumbai news
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण: लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या महत्त्वाच्या गुंडाचा सहभागाचा संशय

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्याला व्यायाम करताना दिसतो. हे व्यायाम पोट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

१. सुरुवातीला जमीनीवर झोपा. पाय सरळ ठेवा दोन्ही हात डोक्याजवळ पकडा. डोक्यापासून पोटापर्यंतचा भाग उचलण्याचा प्रयत्न करा

२. जमीनीवर झोपा व पाय फोल्ड करा. त्यानंतर दोन्ही हात व पोटापर्यंतचे शरीर उचलण्याचा प्रयत्न करा.

३. जमीनीवर झोपा. दोन्ही पाय सरळ ठेवा. त्यानंतर सुरुवातीला डाव्या हात आणि उजवा पाय उचलून स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. फक्त पोटापर्यंतचा भाग उचलू शकता. त्यानंतर उजवा हात आणि डावा पाय उचलून एकमेकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

४. जमीनीवर झोपा. दोन्ही पाय सरळ ठेवा. त्यानंतर दोन्ही हात आणि दोन्ही पाय उचला आणि हाताने पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

नियमित वरील व्यायाम केल्यास पोट कमी होण्यास मदत होऊ शकते. वरील व्यायाम कसे करावे, हे चांगल्याने समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा

हेही वाचा : रोज काम करताना जास्त वाकून बसता, चुकीच्या पद्धतीने उभे राहता? मग थांबा! तुम्हाला होऊ शकतात ‘या’ गंभीर समस्या, तज्ज्ञ सांगतात…

balajiburange57′ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पोठ कमी करण्यासाठी बेस्ट एक्सरसाइज” या व्हिडीोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मांड्या बारीक कसे करावे व्यायाम सांगा” तर एका युजरने लिहिलेय, “भावा तू सांगितलेल्या एक्सरसाइजमुळे कंबरेला त्रास होतो..मी करून बघितले आहे..” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

Story img Loader