scorecardresearch

Premium

पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करायची? हे तीन व्यायाम प्रकार जाणून घ्या, पाहा VIDEO

योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी यांनी पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तीन सोपी व्यायाम प्रकार सांगितले आहेत. अतिशय उपयुक्त ठरतील अशी तीन व्यायाम प्रकार त्या करून दाखवत आहेत.

how to lose belly fat
पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करायची? (Photo : Instagram)

सध्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करत आहोत.चुकीच्या जीवनशैलीमुळे वजनवाढी सारख्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दिवसभर एकाच ठिकाणी बसून तासनतास काम केल्यामुळे शारीरिक हालचाल होत नाही आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.अशात पोटाची चरबी वाढण्याची दाट शक्यता असते. जर तुमच्या पोटावर चरबी वाढलेली असेल आणि ही अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी यांनी पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तीन सोपी व्यायाम प्रकार सांगितले आहेत. अतिशय उपयुक्त ठरतील अशी तीन व्यायाम प्रकार त्या करून दाखवत आहेत.

Narayan Rane Ashok Chavan
“माझं येणं आणि नारायण राणेंचं जाणं…”, अशोक चव्हाणांनी सांगितली भाजपाची निवडणुकीची योजना
marathi actress Ketaki Chitale target to manoj jarange patil
‘यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये…”, मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केतकी चितळेची पोस्ट, म्हणाली…
5 drinks to lose belly fat and weight loss
पोटावरची चरबी आणि वजन दोन्ही घटेल; पाहा ही पाच घरगुती पेये करतील मदत….
Yoga for belly fat
सुटलेले पोट कमी करायचेय? योगा तज्ज्ञ म्हणतात, नियमित करा ‘ही’ दोन योगासने; महिनाभरात व्हाल सडपातळ

तीन व्यायाम प्रकार खालीलप्रमाणे :

१. मृणालिनी या व्हिडीओत करुन दाखवत आहे. सुरुवातीला दोन्ही पायात अंतर ठेवून पाय लांब करावे. पूर्वी धान्य दळण्यासाठी वापरले जाणारे जाते जसे फिरवायचे तसे हात घड्याळ्याच्या सरळ आणि विरुद्ध दिशेने फिरवावे. प्रत्येकी वीस वेळा तीन सेटमध्ये सरळ आणि उलट दिशेने फिरवा. त्यासाठी व्हिडीओ नीट एकदा पाहा.
२. त्यानंतर दोन्ही पायात अंतर ठेवून पाय लांब करावे. उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्याला लावावा आणि डावा हात उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावा. प्रत्येकी २० वेळा हे तीन सेटमध्ये करावे.
३. दोन्ही पायात अंतर ठेवून आणि पाय लांब करुन बसावे.दोन्ही हात मानेवर ठेवावे.कंबर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला वळवावी. असे प्रत्येकी वीस वेळा तीन सेटमध्ये करावे.

हेही वाचा : आईची हिल्स घालून चिमुकलीने केला चालण्याचा सराव, क्युट व्हिडीओ एकदा पाहाच…

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मृणालिणी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पोट कमी करण्यासाठी योगा व व्यायामाबरोबरच नियंत्रित आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता असते.

१.चमचमीत पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, अतिसाखर, जंकफूड यांसारखे पदार्थ आहारात घेऊ नये.
२.योगाबरोबरर धावणे, दोरीउड्या, पोहणे हेही चरबी कमी करण्यासाठी व्यायामाचे चांगले पर्याय आहेत.
३. व्यायामातून एका दिवसाला किती कॅलरी बर्न करू शकतो याचे गणित समजून घ्या आणि नियमितपणे त्याचे पालन करा.
४. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, हाडांचा आजार किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुमची गॅलरी खूप सुंदर आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “सोपा आणि उपयुक्त योगा.. योगा गुरू” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to lose belly fat try three exercise to lose extra fat on belly or a flatter stomach weight loss yoga tips ndj

First published on: 08-11-2023 at 07:58 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×