scorecardresearch

Premium

साध्या कढईला Non Stick कसे बनवावे? जाणून घ्या सोपी ट्रिक, पाहा व्हायरल व्हिडीओ

कोणतेही भांडे Non Stick बनवण्यासाठी सोपी ट्रिक वापरा पाहा व्हायरल व्हिडीओ

how to make a normal iron pan non stick chef kunal told Simple Trick Viral Video
कोणतेही भांडे Non Stick बनवण्यासाठी सोपी ट्रिक वापरा पाहा व्हायरल व्हिडीओ (फोटो लोकसत्ता टीम)

How To Make A Normal Iron Kadai Non-Stick: स्वयंपाक करताना नेहमी भांड्याला भाजी चिकटते. विशेषत: जेव्हा तुम्ही भातापासून कोणाताही पदार्थ तयार करता तेव्हा. जसे फ्राईड राईस, किंवा पुलाव इ. जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढई नसेल तर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्हाला माहितीये का? एक स्मार्ट ट्रिकसह तुम्ही कोणत्याही नॉर्मल कढईला नॉन स्टिक कढई बनवू शकता. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी ही ट्रिक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. शेफ कुणाल यांनी एक व्हिडीओ शेअर करून ही ट्रिक कशी वापरावी हे सांगितले आहे.


शेफ कुणास कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सामान्य कढईला नॉन स्टिक बनवण्याची सोपी टीप. व्हिडीओमध्ये शेफ कुणाल सांगतात की, “नेहमी लोक या गोष्टीची तक्रार करतात की, भात फ्राय करताना तो कढईच्या तळाला चिकटतो, अशा स्थितीमध्ये तुम्ही नॉन स्टिक कढई नसेल तर काळजी करू नका. तुम्ही साध्या कढईला नॉनस्टिक बनवू शकता.”

Morning Drinks to Lower Cholesterol Levels
वाईट कोलेस्ट्रॉलच्या समूळ नाशासाठी सकाळी घ्या ‘हे’ पेय; त्रास झटक्यात होऊ शकतो कमी
japan truck driver uses lazer line prevent road accident
मानलं भावा तुला! अपघात टाळण्यासाठी ट्रक ड्रायव्हरचा भन्नाट जुगाड; VIDEO पाहून डोळ्यावर विश्वास नाही बसणार
Amazing Trick to Peel Pomegranate
चमचा वापरून १ मिनिटांत सोला डाळींब; जाणून घ्या काय आहे भन्नाट ट्रिक; Video होतोय व्हायरल
an old man kombda dance funny video viral
कोंबडा डान्स व्हायरल! आजोबांनी केलेल्या अतरंगी डान्सची सगळीकडे चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच…

हेही वाचा – फ्रिजरमध्ये बर्फ झालाय? मग फक्त बटाटा वापरा! कोणतेही भांडे चिकटून बसणार नाही…पाहा Viral Video

हेही वाचा – नाश्ता किंवा जेवणाची योग्य वेळ कोणती? वजन कमी करण्यासाठी काय करावे?

साध्या कढईला असे बनवा नॉनस्टिक

शेफ कुणाल यांनी सांगितले की, ही सोपी ट्रिक वापरताना सुरुवातील एक कढई गॅसवर ठेवून गरम करा. इतकी गरम करा की लोखंडी कढई इंद्रधनुष्याच्या रंगाची दिसू लागेल. आता कढईत तेल टाकून गरम होऊ द्या. जेव्हा तेल पूर्ण पण गरम होईल आणि धूर येऊ लागेल तेव्हा कापडी रुमालाने तेल पूर्ण कढईला लावून घ्या. आता तुम्हाला ही कढई नॉन स्टिकसारखी गरम करावी लागेल. तुम्हाला इच्छा असल्यास तुम्ही त्यात भात करू शकता किंवा दुसरा कोणताही पदार्थ. पण ही ट्रिक तुम्हाला कोणताही पदार्थ तयार करण्यापूर्वी नेहमी वापरावी लागेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to make a normal iron pan non stick chef kunal told simple trick viral video snk

First published on: 07-10-2023 at 14:26 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×