Tips and Tricks To Make Curd At Home : सोशल मीडियावर नेहमीच विविध खाद्यपदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये स्वयंपाकाशी संबंधित अनेक सोप्या टिप्स आणि ट्रिक्स पाहायला मिळतात. विशेषतः नवीन काहीतरी बनवायचे असेल किंवा स्वयंपाकघरातील एखादा महत्त्वाचा पदार्थ संपला असेल, तर अशा व्हिडीओमधून पर्याय मिळू शकतात.

जसं दही लावण्यासाठी दुधाची गरज लागते. पण, ऐनवेळी दूध संपलं असेल तर तुम्ही छोलेचा वापर करू शकता, असं मी नाही बावा ग्रुप ऑफ हॉटेल्सचे पाककला संचालक, शेफ स्वप्निल मुळे म्हणत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार छोले रात्रभर पाण्यात भिजवल्याने आंबवण्याची प्रक्रिया होते. यामुळे त्यांचे सिम्बायोटिक्समध्ये रूपांतर होते, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे तंतू चांगल्या बॅक्टेरियांच्या, म्हणजेच लॅक्टोबॅसिलसच्या वाढीस चालना देतात.

तुम्ही स्टार्टर कसा बनवू शकता?

छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर थोडे पाणी बाजूला काढून ठेवा. भिजवलेले छोले या बाजूला काढून ठेवलेल्या पाण्यासह आणि ताजे पाणी घालून बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा.

पारंपरिक पद्धतीत,

  • भिजवलेले आणि शिजवलेले छोले पाण्यासोबत बारीक करून त्याचे मिश्रण तयार केले जाते.
  • हे मिश्रण स्वच्छ भांड्यात झाकून खोलीच्या तापमानावर ठेवावे.
  • यामुळे त्यात नैसर्गिकरीत्या आंबवण्याची प्रक्रिया सुरू होते.
  • मिश्रणाला किंचित आंबट वास आणि चव येऊ लागल्यावर त्यातील थोडे मिश्रण दुसरे मिश्रण आंबवण्यासाठी वापरता येते.

असे केआयएमएस हॉस्पिटल्स, ठाणे येथील मुख्य आहारतज्ज्ञ अमरीन शेख यांनी सांगितले.

छोलेपासून बनवलेले, आंबवलेले दही; सामान्य दह्यापेक्षा कसे वेगळे आहे?

ही प्रक्रिया सामान्य दह्याचा एक चमचा स्टार्टर म्हणून वापरण्यापेक्षा वेगळी आहे. या पद्धतीत तयार होणाऱ्या सूक्ष्मजीवांचे स्वरूप निश्चित नसते. त्यामुळे स्वच्छता राखणे, आंबवण्याची प्रक्रिया योग्य परिस्थितीत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पौष्टिक असतं का?

सामान्य दुधापासून बनवलेले दही विशिष्ट प्रकारच्या लॅक्टिक सिड बॅक्टेरियांच्या मदतीने तयार केले जाते. हे जीवाणू दुधातील लॅक्टोजचे आंबवण्याचे काम करतात. सामान्य दह्यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक घटक मिळतात.

छोलेपासून तयार केलेले आणि आंबवलेले दही डेअरी-फ्री असते. त्यामुळे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ टाळणाऱ्या लोकांसाठी हा एक पर्याय ठरू शकतो. हरभऱ्यामध्ये वनस्पतीजन्य प्रथिने, फायबर, लोह, फोलेट आणि इतर पोषक घटक असतात. तसेच, आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे त्यातील काही घटक पचण्यास सोपे होऊ शकतात आणि कडधान्यांमध्ये असलेले काही अँटी-न्यूट्रिशनल घटक कमी होण्यास मदत होऊ शकते.

मात्र, पोषणाच्या दृष्टीने बघायला गेल्यास छोलेपासून बनवलेले आंबवलेले उत्पादन आणि सामान्य दही एकसारखे फायदे देत नाहीत. दही बनवताना चण्याच्या मिश्रणासह आंबवल्याने ते कॅल्शियम, प्रथिनांची गुणवत्ता किंवा प्रोबायोटिक्सच्या प्रमाणाच्या बाबतीत सामान्य दह्याइतकेच असेल, असे म्हणता येणार नाही.

घरी दही बनवताना लोकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

स्वच्छ भांडी, स्वच्छ पाणी आणि योग्य साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर मिश्रणाला दुर्गंधी आली, त्याचा रंग बदलला, त्यावर बुरशी आली किंवा ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले, तर ते फेकून दिले पाहिजे. प्रोबायोटिक्सचे सातत्यपूर्ण फायदे मिळवण्यासाठी ओळखलेले कल्चर वापरून व्यावसायिक पद्धतीने तयार केलेले, आंबवलेले वनस्पती-आधारित उत्पादन अधिक विश्वासार्ह पर्याय ठरते; असे तज्ज्ञांनी सांगितले.