ड्राय एग्ज मसाला

साहित्य :
उकडलेली अंडी – सहा
सुक्या खोबऱ्याचा कीस – दोन वाटय़ा
भाजलेले तीळ – पाव वाटी
भाजलेली खसखस – पाव वाटी
उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या – चार
तिखट – दोन टेबल स्पून
गरम मसाला पावडर – एक टी. स्पून
मीठ – चवीनुसार
हळद – अर्धा टी स्पून
हिंग – अर्धा टी स्पून
तेल – पाव कप
चिरलेली कोथिंबीर – पाव कप
उभा चिरलेला कांदा – एक
कृती : उकडलेली अंडी दोन भागांत कापून घ्या. कढईत तेल तापवा. त्यात कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या. हळद, हिंग घाला, नंतर सुक्या खोबऱ्याचा कीस घालून छान परता. तिखट, गरम मसाला
पावडर, मिरच्या घाला, तीळ, खसखस घालून छान एकजीव करा. मीठ उकडलेल्या अंडय़ांचे काप घालून सावकाश मिक्स करा, वरून कोथिंबीर घाला. चपाती, भाकरीबरोबर सव्‍‌र्ह करा.

इटालियन ऑम्लेट
साहित्य :
अंडी दोन
चिरलेली पिवळी, हिरवी, लाल ढबू मिरची – पाव वाटी
क्रीम – दोन टी स्पून
मीठ – चवीनुसार
चिरलेला कांदा – एक टेबल स्पून
ओरेगॅनो, चिलीफ्लेक्स – प्रत्येकी पाव टी. स्पून
बटर – गरजेनुसार
कृती : अंडी छान फेटून घ्या, त्यात सर्व साहित्य, क्रीम घालून परत छान फेटून घ्या. पॅनमध्ये बटर घाला, त्यावर मिश्रण ओता, झाकून वाफ येऊ द्या. दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. वेफर्सबरोबर सव्‍‌र्ह करा.

फ्रेंच टोस्ट
साहित्य :
अंडी – एक
दूध – एक वाटी
पिठीसाखर – दोन टी स्पून
बटर – गरजेनुसार
ब्रेड स्लाइस – गरजेनुसार
कृती :
अंडं छान फेटून घ्या, त्यात दूध, पिठीसाखर घालून एकजीव करा.
नॉनस्टिक पॅनवर बटर घाला. दुधाच्या मिश्रणात ब्रेडस्लाइस बुडवून पॅनवर ठेवा. दोन्ही बाजूंनी लालसर भाजून घ्या. तिरके कट करून जॅमसोबत सव्‍‌र्ह करा. लहान मुलांना ही डिश खूप आवडते. दूध आणि अंडी असल्यामुळे चांगला पौष्टिक नाश्ता होतो.

मंजिरी कपडेकर
सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com