scorecardresearch

गौरीच्या ओवस्याला घरच्या घरी बनवा केमिकल विरहित कुंकू; फक्त ५ मिनिटात होईल तयार…

फक्त ५ मिनिटात बनवा घरच्या घरी केमिकल विरहित कुंकू

how to make natural kumkum in marathi
फक्त ५ मिनिटात बनवा घरच्या घरी केमिकल विरहित कुंकू (फोटो – @Puneritadka)

Ganesh utsav 2023 भारतीयांमध्ये ‘कुंकू’ या सौदर्य साधनाला फार महत्त्वाचं स्थान आहे. कुंकू हे महत्वाचं ‘सौभाग्य लेणं’ असल्यामुळे विशेषतः विवाहीत महिला कुंकू लावतात. महिलांनी कपाळ आणि केसांच्या मध्यभागी म्हणजेच भांगेमध्ये कुंकू लावण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. आजकालच्या आधूनिक जीवनशैलीत कुंकवाची जागा टिकली या सौंदर्यसाधनाने घेतली आहे. मात्र असं असली तरी लग्न, सणासुदीला आणि अनेक धार्मिक विधींसाठी कुंकू आवर्जून वापरलं जातं. सणासुदीच्या दिवसांना सध्या सुरुवात होत आहे त्यामुळे पूजाविधींसाठी घरात कुंकवाची गरज सर्वांनाच भासणार. मात्र कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे बाजारातील तयार कुंकू घेणं सध्या आरोग्यासाठी हितकारक नाही. शिवाय बाजारात मिळणाऱ्या कुंकवामध्ये केमिकल्सदेखील मिसळलेली असण्याची शक्यता असते. यासाठीच जाणून घ्या नैसर्गिक पद्धतीने घरीच कुंकू कसं तयार करावं.

साहित्य

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
  • १ किलो साबुत हळद, पावडर बनवलेली, तुम्ही हळद पावडचा उपयोग करु शकता.
  • २०-२५ थेंब लिंबूचा रस
  • चुना
  • गुलाबाच्या पाकळ्या

फक्त ५ मिनिटांत बनवा कुंकू

एका भांड्यामध्ये हळद आणि चुना अथवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड एकत्र मिसळा. त्यात गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट मिसळून मिश्रण एकजीव करा. मिश्रण एकजीव करताना त्याचा रंग बदलू लागतो. नारिंगी रंगाचे मिश्रण हळू हळू लाल गडद होऊ लागते. कुंकू सुकल्यावर त्याची पावडर एका डबीत भरून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला घरीच तयार केलेले कुंकू वापरता येईल. जर तुम्हाला लाल रंगाचे कुंकू हवे असेल तर गरजेपुरते कुंकू तयार करा. कारण ते फार काळ ठेवल्यामुळे पुन्हा हलक्या रंगाचे दिसू लागेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: पायपुसण्यावर कंगवा फिरवताच झाली कमाल! VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

कुंकवामध्ये हळद, चुना आणि पारा वापरला जातो. पाऱ्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय या तिघांच्या मिश्रणामुळे शरीरावरचा ताणतणाव कमी होण्यास मदत होते. मन शांत होते आणि सेक्सची इच्छा वाढते यासाठीच विवाहित महिला कुंकू, सिंदूर लावलात जातं. कपाळ आणि केसांच्या भांगात कुंकवाचा स्पर्श झाल्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आणि शरीरातील चक्र सक्रिय होतात. ज्यामुळे शरीराला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. मात्र बाजारात मिळणाऱ्या कुंकवामध्ये आजकाल लेड ऑक्साईड, सिन्थेटिक डाय आणि सल्फेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्यामुळे कुंकवाचा रंग ठळक होतो. मात्र याचा वापर केल्यामुळे त्वचेच्या समस्या होण्याची शक्यता आहे. यासाठी घरीच नैसर्गिक पद्धतीने कुंकू तयार करा आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 11:48 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×