भारताला ऑलिम्पिकमध्ये शनिवारी नीरज चोप्राने सुवर्ण पदक मिळवत इतिहास घडवला. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने इतिहास घडवला. १३ वर्षानंतर एखाद्या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं. या यशानंतर नीरजवर सर्वच स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे नीरजच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी जंगी तयारी केली असून घरीसुद्धा खास तयारी करण्यात आली आहे. पदक जिंकून आल्यानंतर तुझं थाटात स्वागत करणार असा शब्द नीरजच्या आईने त्याला दिला होता. तसेच त्याच्या आवडीचा चुरमा हा पदार्थही बनवणार असल्याचं त्या म्हणाल्या होता. म्हणून भारताच्या ‘गोल्डन बॉय’ला आवडणारा चुरमा कसा बनवायचा याची रेसिपी खुद्द शेफ संजीव कपूर यांच्याकडूनच शिकून घेऊयात.

साहित्य

१ कप संपूर्ण गव्हाचे पीठ

१/२ कप रवा

१/४ कप तूप – तळण्यासाठी

१/२ कप दूध

१ कप  पिठीसाखर

१/२  टीस्पून हिरवी वेलची पूड

१/४  कप तुकडे केलेले बदाम

१/४  कप तुकडे केलेले काजू

२ चमचे मनुका

पद्धत

१. एका प्लेटमध्ये संपूर्ण गव्हाचे पीठ, रवा आणि तूप घालून मिक्स करा. या मिश्रणात हळू हळू दुध घाला आणि कणिक मळून घ्या. हे पीठ लहान समान भागांमध्ये विभाजित करा, प्रत्येक भागाला आयताकृती आकार द्या.

२. कढईमध्ये पुरेसे तूप गरम करा. गमर तूपात मळलेल्या कणिकेचे लहान भाग हळू हळू सोडा. मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. टिशूपेपरवर काढून घ्या आणि खोलीच्या तपमानावर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

३. थंड झाल्यावर तळलेले आयताकृती कणिकेचे भाग क्रश करा. त्यांना फूड प्रोसेसरच्या भांड्यात टाका आणि बारीक पावडरप्रमाणे बारीक करा.

४. हे मिश्रण एकाभांडयात काढून घ्या. आता या मिश्रणात पिठीसाखर, हिरवी वेलची पूड, बदाम, काजू आणि मनुका घाला. मिक्स करा आणि सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घा.

अशा सोप्प्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बनवू शकता चुरमा हा पदार्थ.