भारतीय लोकांचे जेवण हे पोळी किंवा फुलक्यांशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येकाला फुललेली आणि गरम पोळी खायला आणि बनवायला आवडते. जेव्हा पोळी गोल येते आणि छान फुलते तेव्हा बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्यालाही आनंद होतो. परंतु अनेक लोक पोळीसाठी पीठ मळताना अशी एक चूक करतात, ज्यामुळे आपली पोळी फुलत नाही आणि काही वेळात पापडासारखी कडक होते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला मऊ आणि छान फुललेली चपाती कशी बनवायची ते सांगणार आहोत, चला जाणून घेऊया चपाती बनवण्याची सोपी पद्धत…

आणखी वाचा : “अचानक कारच्या खिडकीवर कोणी तरी ठोठावले अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Veg Tawa Fry Bhaji Recipe In Marathi
हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज तवा फ्राय भाजी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

पोळी, पुरी किंवा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला पीठ मळणे सगळ्यात महत्वाचे आहे. बऱ्याच लोकांना हे काम कंटाळवाणे वाटते, परंतु स्वयंपाक घरातील हे सर्वात महत्वाचे काम आहे.

पीठ मळताना या गोष्टी लक्षात ठेवा

पीठ मळायला जास्त वेळ जाऊ शकतो, परंतु पटापट पीठ मळल्याने आपल्या पोळीची चव खराब होऊ शकते, म्हणून ५ ते १० मिनिटे पीठ मळा.

आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

जरी आपण अनेक गोष्टी मोजून मापून करतो, तरी पीठ मळताना आपण मोजून पाणी घेत नाही, तर अंदाजे घेतो. बऱ्याचवेळा असे केल्याने पीठ एकतर कडक होते किंवा खूप मऊ होते. त्यामुळे परफेक्ट पीठ मळण्यासाठी मोजून पाणी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, २ कप पीठासाठी २ कप पाणी घ्या.

नरम पोळी करण्यासाठी कधीपण एकत्र पाणी टाकून पीठ मळू नका. नेहमी पीठात थोडं थोडं पाणी टाका.

आणखी वाचा : Toothache Problem : दातदुखी पासून सुटका पाहिजे? ‘हे’ ४ घरगुती उपाय नक्कीच करून पाहा

पीठ मळताना त्यात मीठ घालणार असाल तर, पाणी कमी प्रमाणात वापरा. कारण मीठ देखील पाणी सोडते. यामुळे कणिक ओलं होण्याची शक्यता असते.

एकदा कणिक मळून झालं की कणिकाच्या गोळ्याला पसरवा आणि त्यावर थोड पाणी शिंपडून ५ मिनिटं राहू द्या. त्यानंतर पुन्हा एकदा कणिकाला चांगलं मळा.

आणखी वाचा : Papaya Facts : जेवणानंतर पपई खाऊ शकतो का?

त्यानंतर छोटा चमचा तेल किंवा तूप घ्या आणि पुन्हा एकदा पीठ मळा, या वेळी पीठ मऊ आणि गुळगुळीत होईल.

लक्षात ठेवा की गोळे जितके गोलाकार असेल तितकी चपाती सहज गोल होऊ शकेल.

आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

त्यानंतर पोळी करा ही पोळी नक्कीच मऊ असेल.