आज शारदीय नवरात्रची नवमी तिथी आहे. या नवमीला महानवमी देखील म्हणतात. देवीच्या सिद्धिदात्रीची पूजा केली जाते आणि आश्विन शुक्ल अष्टमीला व्रत ठेवले जाते. देशातील अनेक ठिकाणी नवरात्रीच हवन महानवमीच्या दिवशी केले जाते. तर काहीजण विजयादशमीला सुद्धा नवरात्री हवन करतात. दुर्गा महानवमीच्या दिवशी मुलींचीही पूजा केली जाते. जर महानवमीच्या निमित्ताने आज तुमच्या घरी नवरात्री हवन पूजा करण्याचे ठरवले असेल तर आज तुम्हाला नवरात्री हवनाचे साहित्य, मंत्र आणि हवनाची संपूर्ण पद्धत आणि महत्त्व सांगत आहोत. त्यानुसार तुम्ही महानवमी हवन करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानवमी हवन साहित्य

एक कोरडा नारळ किंवा खोबर्‍याची वाटी, लाल रंगाचे कापड आणि हवन कुंड. याशिवाय, आंब्याचे लाकूड, देठ आणि पान, चंदनाचे लाकूड, अश्वगंधा, ब्राह्मी, जेष्ठमध, मुलेठी, पिंपळाचे देठ आणि झाडाची साल, बेल, कडुलिंब, पालाश, दुर्वा, सायकमोर झाडाची साल, कापूर, तीळ, तांदूळ, लवंग, गाईचे तूप, गुग्गुल, वेलची, साखर आणि जव, पान, सुपारी, बताशे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to perform navratri havan on mahanavami today learn the whole method literature mantra and importance scsm
First published on: 14-10-2021 at 11:16 IST