scorecardresearch

Premium

Garlic Farming Jugaad : घरच्या घरी प्लास्टिकच्या बाटलीत करा लसणाची लागवड; जाणून घ्या हा अनोखा जुगाड

Garlic Farming : तुम्हाला माहिती आहे का, दररोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या लसणाची तुम्ही घरच्या घरी लागवड करू शकता. होय, प्लास्टिक बाटलीचा वापर करून तुम्ही लसणाची शेती करू शकता. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.

know amazing jugaad of Garlic farming
घरच्या घरी प्लास्टिकच्या बाटलीत करा लसणाची लागवड (Photo : YouTube)

Garlic Farming : लसूणचा उपयोग स्वयंपाकात आणि औषधींमध्ये केला जातो. लसूण फक्त जेवणाचीच चव वाढवत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही तितकेच फायदेशीर आहे. शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला लसणाची लागवड करतात.
आपण सहसा बाजारातून लसूण विकत आणतो, पण तुम्हाला माहिती आहे का, दररोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या लसणाची तुम्ही घरच्या घरी लागवड करू शकता. होय, प्लास्टिक बाटलीचा वापर करून तुम्ही लसणाची शेती करू शकता. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.

  • सुरुवातीला पाण्याची प्लास्टिक बाटली घ्या. या बाटलीचे तोंड लहान असल्यामुळे ते कापावे, जेणे करून लागवड करण्यास सोपी जाईल.
  • बाटलीत स्वच्छ माती टाका. मातीची गुणवत्ता चांगली असणे खूप गरजेचे आहे; तरच पुढे फायदा दिसून येईल. जर मातीत छोटे-मोठे दगड असतील तर रोपटे वाढणार नाही.

हेही वाचा : बाथरूमचा नळ गंजला आहे का? असा करा झटक्यात स्वच्छ, चमकेल चांदीसारखा!

Consuming dark tea manage blood sugar levels and reduce the risk of developing diabetes Benefits of Black Tea Without Milk
कोरा चहा नेहमी प्यायल्याने डायबिटीक रुग्णांना मिळतात ‘हे’ मोठे फायदे; अभ्यासातून समोर आली माहिती
if children dont like to study parents should try these tips
पालकांनो, तुमची मुले अभ्यास करत नाहीत? ‘या’ टिप्स वापरून पाहा; न सांगता करतील अभ्यास….
parenting tips to clean ink stains from school dress in marathi
शाळेच्या ड्रेसवर पडलेले शाईचे डाग निघत नाहीत? मग वापरा ‘या’ टिप्स, डाग काही मिनिटांत होतील गायब
How_squats_can_help_you_strengthen_legs
स्क्वॅट्समुळे तुमचे पाय कसे होतील मजबूत? कसे करावे स्क्वॅट्स? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
  • बाटलीत माती टाकल्यानंतर त्यावर लसणाच्या पाकळ्या टाका. लक्षात ठेवा की, लागवड करताना लसणाच्या पाकळीची मुळाकडील बाजू मातीच्या दिशेने लावावी आणि पाकळीची साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
  • लसणाची पाकळी मातीत पेरल्यानंतर त्यावर पुन्हा माती टाकावी. दररोज थोडे थोडे पाणी टाकावे.
  • काही दिवसातच तुम्हाला नवं रोपटं वर आलेलं दिसेल. या रोपट्याला नियमित थोडं थोडं पाणी द्या. अशाप्रकारे घरच्या घरी तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करून लसणाची लागवड करू शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to plant garlic at home using plastic bottle know amazing jugaad of garlic farming ndj

First published on: 14-09-2023 at 15:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×