How to Reduce AC Bill: मार्च महिना म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात. यावेळी तर मार्चमध्येच उन्हाने अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहेत. मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये तापमान ४१ डिग्रीपर्यंत गेलं आहे. बुंदेलखंडमध्येही जवळपास अशीच परिस्थिती आहे. हवामान तज्ञांच्या मते, यंदाचा उन्हाळा मोठा आणि खूप तीव्र असू शकतो.

उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक कूलर आणि एसी दुरुस्त करत आहेत. काही ठिकाणी त्यांचा वापर सुरूही झाला आहे. यामुळे उष्णतेपासून आराम मिळतो, पण वीज मीटर मात्र वेगाने फिरू लागतं. त्यामुळे वीज बिल वाढतं. विशेषतः जितका जास्त एसी वापराल, तितकं जास्त बिल येतं.

शहरांमध्ये उष्णतेपासून वाचण्यासाठी ऑफिस, दुकाने आणि घरांमध्येही एसीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण जर तुम्ही उष्णतेपासूनही वाचलात आणि वीज बिलही कमी आलं तर कसं वाटेल? हो, आश्चर्य वाटेल पण हे शक्य आहे.

Award Banner

आज आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत, जो तुमचं वीज बील झटक्यात कमी करेल. मध्य प्रदेशातील सागर येथे गेली ४ वर्षे फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसीची कामे करणारे इलेक्ट्रिशियन रोहित प्रजापती सांगतात की, उन्हाळ्यात एसी सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू केल्यानंतर सर्वात आधी त्याची सर्व्हिसिंग करून घ्या.

एसी किती तापमानावर चालवावा

एसीची सर्व्हिसिंग केल्याने त्यावर जास्त लोड पडत नाही. त्यामुळे वीज बिल कमी येतं. जर एसी घाण झाला असेल तर त्यावर जास्त ताण येतो. कंप्रेसर आणि जाळीत उष्णता तयार होते. एसी सतत चालू राहिला तर लोड वाढतो आणि वीज जास्त खर्च होते.

एसी वापरणाऱ्या लोकांनी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे एसी नेहमी नॉर्मल तापमानावर चालवावा. नॉर्मल तापमान साधारण २४ ते २५ डिग्री असते. यामुळे एसीवर जास्त ताण येत नाही आणि शरीरासाठीही ते नुकसानकारक नसतं.

एसी थेट बंद करू नका

याशिवाय, एसी चालू किंवा बंद करताना नेहमी रिमोटचा वापर करावा. कारण एसी थेट बंद केल्यास फ्लकचुएशनसारखी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे एसीचे पार्ट्स हळूहळू खराब होऊ लागतात आणि एसी नीट काम करत नाही. तसेच याचा परिणाम वीज बिल वाढण्यातही होतो.