How to reduce fatty liver: आपण रोजच्या धावपळीमध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे परिणाम पुढे गंभीर स्वरूपात दिसू लागतात. आजकाल वाढलेला ताण, चुकीच्या आहार पद्धती आणि बसून राहण्याची सवय, यामुळे शरीरातील अवयवांवर मोठा ताण येतो. पोटाभोवती चरबी साचणे, अपचन, थकवा किंवा सुजलेले पाय ही लक्षणे आपण साधारण समजतो; पण यामागे शरीरातील महत्त्वाचा अवयव कमकुवत होत असल्याची चिन्हे दडलेली असतात.
आपले यकृत आपल्या शरीरातील सर्वांत मोठा आणि सर्वांत मजबूत अवयव आहे. तथापि, जेव्हा अनारोग्यपूर्ण जीवनशैली अतिरेकी होते तेव्हा यकृताच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आजकाल महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये फॅटी लिव्हर ही एक सामान्य समस्या आहे. फॅटी लिव्हरला एक सामान्य आजार मानणे धोकादायक आहे, कारण त्याची अवस्था जसजशी वाढत जाते, तसतशी ती अधिक गंभीर होऊ शकते. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सौरभ सेठी यांच्या मते अति मद्यपान, चरबीयुक्त पदार्थ आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांचाही यकृताच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे SGPT आणि GGPT ची पातळी वाढू शकते आणि फॅटी लिव्हरसारख्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून जर तुम्हाला निरोगी यकृत राखायचे असेल तर तुमच्या आहार आणि जीवनशैलीच्या काही पैलूंवर लक्ष देणे आवश्यक आहे.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
फायबरयुक्त पदार्थ खा –
फायबर यकृतासाठी सर्वोत्तम आहे. आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा आणि भरपूर सॅलेड खा. उच्च फायबरयुक्त पदार्थ आतड्यांना निरोगी ठेवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे यकृतावरील ताण कमी होतो. सॅलेड खाल्ल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि साठलेली विषारी द्रव्ये नाहीशी होतात.
तेल आणि मसाले कमी खा –
जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याचा यकृताच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे तुम्ही दररोज कमी तेलकट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे. उकडलेले किंवा भाजलेले पदार्थ खावेत. जास्त पुऱ्या आणि पराठे खाणे टाळावे आणि भाज्या शिजवताना कमी तेल वापरावे.
भरपूर पाणी प्या –
यकृताचे कार्य सुधारण्यासाठी दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्या. शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. यामुळे नैसर्गिकरित्या शरीरातील विषारी घटक शौचावाटे बाहेर टाकले जातात.
व्यायाम –
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारापेक्षाही तुमचा व्यायाम अधिक महत्त्वाचा आहे. यकृत असो वा इतर कोणताही अवयव, चरबी हा सर्वांत मोठा शत्रू आहे. यकृत निरोगी ठेवण्यासाठी दररोज काहीतरी शारीरिक व्यायाम करा. जेवणानंतर फिरायला जा आणि दररोज ४०-४५ मिनिटे तीव्र व्यायाम करा. यामुळे यकृत निरोगी राहील. फक्त आहार शुद्ध ठेवणे पुरेसे नाही, तर शरीर सक्रिय ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रोज किमान अर्धा तास जलद चालण्याची सवय लावल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढतो, त्यामुळे लिव्हरवर साचलेली चरबी हळूहळू कमी होऊ लागते. जर शक्य असेल तर सूर्यनमस्कार, कपालभाती यांसारखे सोपे योगासने केल्यास लिव्हरची कार्यक्षमता आणखी वाढते. नियमित हालचालींमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि मनही प्रसन्न राहते. शिवाय कोमट तेलाने पोटाची व नाभीची मालिश करा.
मनःशांती आणि विश्रांतीचे महत्त्व
सततच्या तणावामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो आणि लिव्हरवरही त्याचा परिणाम जाणवतो, म्हणून पुरेशी झोप घेणे, ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करणे हेही लिव्हरच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. मानसिक शांती मिळाल्यास शरीराची कार्यक्षमता वाढते आणि उपचारांचा परिणाम अधिक चांगला होतो.
फक्त ५ रुपयांत तयार होणारं घरगुती आयुर्वेदिक औषध
या औषधासाठी तुम्हाला लागतील अगदी सहज मिळणाऱ्या गोष्टी! १५ ते २० ताजी तुळशीची पानं आणि ४ ते ५ काळी मिरी. या दोन्ही घटकांना खलबत्त्यात किंवा पाट्यावर चांगले वाटून घ्यायचे. त्याची जाडसर चटणी तयार झाली की ती एका स्वच्छ सूती कपड्यात ठेवून त्या कपड्याला कोमट पाण्यात बुडवून चांगले ???निचोडून???(की पिळून) घ्यायचे. त्याने तयार झालेला अर्क म्हणजेच तुमचे औषध. हे औषध शरीरातील दोष शमवण्याचे काम करते.
कधी खायचं हे औषध
हे औषध जेवण झाल्यावर सुमारे एका तासाने घ्यायचे. दिवसातून ३ ते ४ वेळा याचा वापर करायचा आहे. औषध घेतल्यानंतर, त्याच दिवशी सकाळी आणि संध्याकाळी शिलाजीतचे १२५ ते २०० एमजीचे एक कॅप्सूल घ्यायचे आहे. हे दोन्ही उपाय एकत्र केल्यास शरीरातील जमा कफ वितळतो, पचन सुधारते आणि लिव्हर-किडनीवरील अतिरिक्त दाब कमी होतो. परिणामस्वरूप लक्षणे हळूहळू कमी होऊ लागतात.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
