scorecardresearch

Premium

भांडी घासल्यानंतरही अंड्याचा वास राहतो? मग किचनमधील ‘या’ गोष्टींचा करा वापर, दुर्गंधी सहज होईल दूर

भांड्यांना येणारा अंड्याचा वास दूर करण्यासाठी तुम्ही किचनमधील काही गोष्टींचा वापर करुन वास चूटकीसरशी दूर करु शकता.

how to reomve egg smell from utensill esaily tips to remove eggs smell from utensils kitchen tips for washing dishes
भांड्यांना अंड्याचा येणारा वास दूर करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

बऱ्याच जणांना अंडी खायला आवडतात पण त्याचा वास अजिबात आवडत नाही. कारण अंड्याचा वास इतका भयानक असतो की अनेकदा खाण्याची इच्छाही होत नाही. कित्येकदा अंडी उकडल्यानंतर किंवा तव्यावर अंडीच्या पोळी बनवल्यानंतर भांड्याला त्याचा वास येत राहतो. कितीही साफ केला तो वास पटकन जात नाही. अशावेळी काय करावे समजत नाही. पण आता काळजी करु नका आम्ही तुम्हाला भांड्यांना अंड्याचा येणारा वास दूर करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगार आहेत. ज्याच्या मदतीन तुम्ही एका धुण्यातच भांड्यांना येणार अंड्याचा वास पूर्णपणे काढू शकता.

भांड्यांमधील अंड्याचा वास दूर करण्यासाठी टिप्स

१) भांड्यातील अंड्याचा वास दूर करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम गरम पाणी आणि बेसन पीठाने स्वच्छ करा. यानंतर भांड धुवून त्यावर लिंबू चोळून पुन्हा पाण्याने धुवा.

Bad breath after brushing
ब्रश केल्यानंतर सुद्धा तोंडाचा वास येतोय? हे खास टिप्स वापरून पाहा, दुर्गंध होईल गायब
Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….
how to get rid of fish odor tips
Kitchen tips : स्वयंपाक घरातील मच्छीचा वास कसा घालवावा? पाहा या ४ सोप्या टिप्स
four couple yoga pose to stay fit together
Couple yoga poses : नाते आणि आरोग्य दोन्ही राहील उत्तम! तंदुरुस्त रहाण्यासाठी हे ४ प्रकार पाहा

२) अंड्याचा वास येणारं भांड व्हिनेगर, मिठाचे पाणी किंवा चहाच्या पाण्यात काहीवेळ भांड भिजवून ठेवा नंतर स्वच्छ धुवा. यासाठी तुम्हाला अंड्याचा वास येणाऱ्या भांड्यामध्ये चार ते पाच चमचे व्हिनेगर, मिठाचे पाणी किंवा चहा पावडरचे पाणी टाकून ठेवावे लागेल. मग थोड्या वेळाने ते भांडं स्वच्छ पाण्याने धुवावे लागेल. त्यामुळे अंड्याचा वास काही मिनिटांमध्ये गायब होईल.

३) भांड्यांना येणार अंड्याचा वास दूर करण्यासाठी त्यावर बेकिंग सोडा देखील उपयोगी येतो, यासाठी अंड्याचा वास येणारे भांड बेकिंग सोडा आणि डिशवॉशर घालून ते दहा मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. यानंतर ते साबणाने घासून भांडी स्वच्छ करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to remove egg smell from utensils easily tips to remove eggs smell from utensils kitchen tips for washing dishes sjr

First published on: 13-09-2023 at 14:40 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×