What lifestyle changes can prevent a heart attack : भारतामध्ये हृदयविकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या २०२० च्या अभ्यासानुसार, लोकसंख्येच्या तुलनेत हृदयाशी संबंधित आजार (CVD) पाश्चात्त्य देशांच्या लोकांपेक्षा भारतीयांमध्ये साधारणपणे १० वर्षे आधी दिसून येतात. भारतीयांसाठी या आजाराबाबत काही विशेष चिंतेच्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे कमी वयात आजार होणे, आजार लवकर वाढत जाणे, मृत्युदर जास्त असणे इत्यादी. साधारणपणे कारणं माहीत असूनही हा धोका का वाढला आहे, हे पूर्णपणे समजत नाही.
हृदयविकाराच्या समस्येची मुळे अनेक वर्षांपूर्वीच रोवली जातात आणि त्यामागे अनेकदा दररोजच्या आहाराच्या सवयी कारणीभूत असतात. कधी कधी स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत; पण लहानपणापासून किंवा वारंवार एकाच प्रकारचे पदार्थ खाल्ल्यामुळे हळूहळू शरीरात जळजळ निर्माण होणे, इन्सुलिन हार्मोनला शरीराकडून योग्य प्रतिसाद न मिळणे, आतड्यांमध्ये चरबी जमा होणे आणि धमन्यांवर विपरीत परिणाम होणे अशा गोष्टी घडतात. परिणामी हृदयाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते.
म्हणूनच नवी दिल्लीतील मधुमेहतज्ज्ञ डॉक्टर ब्रिजमोहन अरोरा यांनी अलीकडेच आहारातील पाच प्रमुख चुकांवर प्रकाश टाकला, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जर तुम्हाला कधीही अचानक हृदयविकाराचा झटका येऊ नये असे वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या आहारातून या पाच चुका काढून टाकल्या पाहिजेत. या पाच चुका तुमच्या हृदयाचे आतून नुकसान करतात.
हृदयविकाराची कारणे स्वयंपाकघरातून सुरू होतात…
- बियांचे तेल (Seed oils)
- अति-प्रक्रिया केलेले / पाकिटातील अन्न
- साखरयुक्त पेये
- प्रक्रिया केलेली धान्ये (पाव, पास्ता, मैदा)
- प्रक्रिया केलेले मांस
शरीरात हळुवार आपल्या लक्षात येणार नाही अशा रीतीने काही समस्या निर्माण करतात. जसे की, इन्सुलिन रेझिस्टन्स, सूज, पोटाभोवती वाढणारी चरबी व धमन्यांचे नुकसान. म्हणूनच जर चयापचय (मेटाबॉलिझम) क्षमतेत सुधारणा झाली, तर आजारांचा धोका कमी होऊ शकतो. पण, याचबरोबर आहारातील संतुलन, अन्नाचे योग्य प्रमाण, एकूण आहार पद्धती, वैयक्तिक जोखीम इत्यादी बाबतीत असंख्य प्रश्नही निर्माण होतात. त्या दृष्टीने या बाबतीत विचार करणेही तितकेच आवश्यक आहे.
अन्नपदार्थांना हृदयविकाराशी थेट जोडणारे वैज्ञानिक पुरावे किती खरे?
सार्वजनिक आरोग्य बुद्धिजीवी डॉक्टर जगदीश हिरेमठ यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, आहार आणि हृदयरोग यांचा मजबूत संबंध आहे. पण, हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे की, उदभवणारा धोका हा सेवन केल्या जाणाऱ्या अन्नापेक्षा आपण ते अन्नपदार्थ कशा पद्धतीने बनवतो यावर अवलंबून असतो. एका अभ्यासात आणि मेटा-विश्लेषणातून सातत्याने असे दिसून येते की, प्रोसेस्ड मांस आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्याचे कारण म्हणजे या पदार्थांमध्ये अनेकदा सॅच्युरेटेड फॅट, सोडियम व प्रिझर्व्हेटिव्हज जास्त प्रमाणात असतात. तसेच रिफाईंड कार्बोहायड्रेट्समुळे रक्तातील साखर पटकन वाढते, ज्यामुळे शरीराच्या चयापचयामध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळात हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.
बियांच्या तेलांचा विचार केला तर, बहुतेक क्लिनिकल डेटा असे सूचित करतात की, अनेकांच्या घरात वनस्पती तेलांचा वापर केला जातो. अनेक वनस्पती तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी अनसॅच्युरेटेड फॅट्सचा वापर केलेला असतो. त्यामुळे LDL कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. परंतु, त्या तेलांचेही मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. तसेच जेव्हा तेल पुन्हा गरम केले जाते किंवा अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमधून ते जास्त प्रमाणात शरीरात जाते. तेव्हा खरी समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
स्वयंपाक करण्याची पद्धत आणि एकूणच आहारातील संतुलन हे महत्त्वाचे आहे. डॉक्टर म्हणतात की, संतुलित आहाराचे अधूनमधून सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता कमी होते. बैठी जीवनशैली, धूम्रपान आणि लठ्ठपणासह वारंवार सेवन केल्याने कालांतराने धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
इन्सुलिन रेझिस्टन्स आणि दीर्घकालीन सूज या बाबी हृदयविकार होण्यात मुख्य भूमिका बजावतात का?
इन्सुलिन रेझिस्टन्स आणि दीर्घकालीन जळजळ हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचे मुख्य कारण आहेत. जेव्हा शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही तेव्हा रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी सतत जास्त राहते. त्यामुळे धमन्यांच्या आतल्या थराला नुकसान होते, प्लॅक तयार होतो आणि अॅथेरोस्क्लेरोसिस (धमन्यांच्या जाडीमुळे रक्तवाहिन्या कडक होतात) वाढतो. त्याचबरोबर दीर्घकालीन सूज प्लॅकला अस्थिर करते, ज्यामुळे प्लॅक फुटण्याची आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
पण, खास गोष्ट अशी की, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि दीर्घकालीन सूज या दोन्ही स्थितींमध्ये सुधारणा करता येते. डॉक्टर हिरेमठ नमूद करतात की, आहारातील रिफाईंड साखरेचे प्रमाण कमी करणे, अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न मर्यादित करणे, फायबरचे सेवन वाढवणे आणि काजू, बिया व चरबीयुक्त मासे खाल्ल्यास काही आठवड्यांमध्ये किंवा महिन्यात इन्सुलिन रेझिस्टन्स लक्षणीयरीत्या सुधारू शकतो. वजन कमी करणे, नियमित शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोप यांमुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
