Reels Addiction Reduce Tips And Tricks: आजकाल लोक मोबाईलवर रील स्क्रोल करून दिवसाची सुरुवात करतात. झोपेतून जागे झाल्याबरोबर लोक आधी मोबाईल हातात घेतात आणि इन्स्टाग्राम, यूट्यूब रील्स पाहू लागतात; पण याचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. सध्याच्या डिजिटल युगामुळे मोबाईलशिवाय जीवन जगणे कठीण झालेय, पण याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम होतोय. लोक सोशल मीडियावर तासनतास वाया घालवतात. हे एक प्रकारे डिजिटल व्यसनाचे लक्षण मानले जाते. याचा तुमच्या संपूर्ण दिवसाच्या शेड्युलवर वाईट परिणाम होतो.
जर तुम्ही या समस्येशी झगडत असाल आणि त्यापासून सुटका मिळवू इच्छित असाल तर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता.
सकाळी उठल्याबरोबर रील्स स्क्रोल करण्याचे तोटे (How to stop the addiction of Instagram reels)
१) झोपेचा अभाव
जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर रील्स स्क्रोल करण्याची सवय असेल तर तुम्ही ही सवय बदलली पाहिजे. ही सवय पूर्णपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे अपुऱ्या झोपेचे लक्षणही असू शकते. निळ्या प्रकाशाचा झोपेच्या हार्मोन्सवर गंभीर परिणाम होतो.
२) लक्ष केंद्रित न होणे
जर तुम्ही तुमचा फोन जास्त वेळ पहात असाल, तर ही सवय हानिकारक ठरू शकते. तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात अडचण, एकाग्रता कमी होणे आणि विसरभोळेपणाचा अनुभव येऊ शकतो.
३) खराब मानसिक आरोग्य
जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमचा मोबाईल चेक करत असाल तर या सवयीमुळे चिंता आणि नैराश्य वाढू शकते. तुमचे मन नेहमी व्यस्त राहील आणि तुम्हाला अधिक तणाव जाणवेल.
रील्स स्क्रोल करण्याची सवय सोडवण्यासाठी काय करावे?
१. पुस्तक वाचा
जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमचा मोबाईल तपासू लागलात तर ही सवय तुमच्या मानसिक आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते. मोबाईल हातात धरण्याऐवजी तुम्ही एखादे पुस्तक वाचायला सुरुवात करू शकता.
२. ध्यान किंवा चालणे
तुम्ही ध्यान करावे किंवा फिरायला जावे, ही पद्धत तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरेल. तुम्ही याचा एक निश्चित सकाळचा दिनक्रम म्हणूनही अवलंब करू शकता.
३. अॅपची वेळ मर्यादा सेट करा
अॅप वापरण्याची वेळ मर्यादा निश्चित करणे हा स्क्रीन टाइम कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ठरवलेल्या वेळेनंतर तुम्ही तुमचा मोबाईल वापरू शकणार नाही.
४. अॅप्स हटवा
जर तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर तुमचा मोबाईल हातात घेत असाल तर ते हानिकारक ठरू शकते. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर वापरत असलेले ॲप्स काढून टाकावेत.
