scorecardresearch

Premium

मीटिंग, लेक्चर मध्ये सतत येतेय जांभई? ‘हे’ उपाय चटकन देतील आराम

जांभई येणे हा आजार नसला तरी आजाराचे लक्षण असू शकते

How To stop Yawning
जांभया थांबवण्याचे सोपे उपाय (फोटो: संग्रहित)

एखादी महत्त्वाची मीटिंग सुरु असते, तुमचे वरिष्ठ तुमच्याकडे बघून काहीतरी सांगत असतात आणि इतक्यात तुम्हाला जांभई येते.. बस सगळ्या बोर्डरूम मध्ये तुमच्या आळशीपणाच्या चर्चा सुरु होतात. तुमचं कामात लक्ष नाही असंही अनेकांना वाटू लागतं. सहसा पुरेशी झोप न झाल्याने थकवा येतो, अशावेळी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन आपल्याला जांभया यायला लागतात. काहीवेळेस एकापाठोपाठ एक जांभया येत असतील तर काय करावे हे पण पटकन सुचत नाही. अर्थात जांभई हा काही आजार नाही त्यामुळे त्यावर एक ठोस गोळी किंवा औषध नाही पण आपण काही सोप्या उपायांनी जांभईवर नियंत्रण आणू शकता.

जांभया थांबवण्याचे सोपे उपाय

  • शरीर थंड असल्यास जास्त जांभई येत नाही. थंड पाणी, आइस टी, कोल्ड कॉफी हे पर्याय उत्तम ठरतील.
  • शरीर हायड्रेटेड ठेवा.
  • दीर्घ श्वास घ्या व तोंडाने हळूहळू सोडा
  • हसल्याने जांभई येण्याचे प्रमाण कमी होते म्हणूनच गप्पा मारून किंवा एखादा मजेशीर व्हिडीओ पाहून जांभई थांबवू शकता.
  • तोंडात काहीतरी चघळत ठेवून जांभई कमी करू शकता, जेवणानंतर बडीशेप किंवा आवळा सुपारी खाल्ल्यास मुखशुद्धी व जांभई कमी होणे हे दोन्ही उपाय होऊ शकतात.
  • दात चावल्याने सुद्धा जांभई कमी होते.

Home Remedies For Low BP: कमी रक्तदाबाच्या समस्येवर दूध ठरेल रामबाण उपाय; सेवन करताना फक्त एवढं करा

how to reduce spiciness in curry ticks Way to Fix Chilli in Curry home remedies
भाजीत चुकून तिखट जास्त पडलं? टेन्शन घेऊ नका, झटपट वापरा हा सोपा उपाय
freezer hacks try potato slices hacks to prevent ice buildup in your freezer
फ्रिजरमध्ये बर्फ झाला आहे का? मग फक्त बटाटा वापरा! कोणतेही भांडे चिकटून बसणार नाही…पाहा Viral Video
Ashwini Mahangade
“करोनामध्ये मृतदेहाला खांदा देण्याचे काम नानांवर पडले अन्…” अश्विनी महांगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “मयतीसाठी लागणारे लाकूड…”
How ragi can control blood sugar
Blood sugar: मधुमेह असेल तर आहारामध्ये ‘या’ पदार्थाचे सेवन लगेच वाढवा! जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला सल्ला

दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जांभई येणे हा आजार नसला तरी आजाराचे लक्षण असू शकते. शरीराचे तापमान कमी होणे, मेंदू व शरीराला
ऑक्सिजन मिळत नसल्यास कार्यक्षमता कमी होणे, लिव्हर निकामी होणे व हृदय विकार याचेही जांभया लक्षण असू शकते. त्यामुळे तुम्हाला थकवा नसतानाही सतत जांभया येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to stop yawning during meeting and lecture with simple tricks svs

First published on: 09-08-2022 at 12:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×