एखादी महत्त्वाची मीटिंग सुरु असते, तुमचे वरिष्ठ तुमच्याकडे बघून काहीतरी सांगत असतात आणि इतक्यात तुम्हाला जांभई येते.. बस सगळ्या बोर्डरूम मध्ये तुमच्या आळशीपणाच्या चर्चा सुरु होतात. तुमचं कामात लक्ष नाही असंही अनेकांना वाटू लागतं. सहसा पुरेशी झोप न झाल्याने थकवा येतो, अशावेळी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन आपल्याला जांभया यायला लागतात. काहीवेळेस एकापाठोपाठ एक जांभया येत असतील तर काय करावे हे पण पटकन सुचत नाही. अर्थात जांभई हा काही आजार नाही त्यामुळे त्यावर एक ठोस गोळी किंवा औषध नाही पण आपण काही सोप्या उपायांनी जांभईवर नियंत्रण आणू शकता.

जांभया थांबवण्याचे सोपे उपाय

  • शरीर थंड असल्यास जास्त जांभई येत नाही. थंड पाणी, आइस टी, कोल्ड कॉफी हे पर्याय उत्तम ठरतील.
  • शरीर हायड्रेटेड ठेवा.
  • दीर्घ श्वास घ्या व तोंडाने हळूहळू सोडा
  • हसल्याने जांभई येण्याचे प्रमाण कमी होते म्हणूनच गप्पा मारून किंवा एखादा मजेशीर व्हिडीओ पाहून जांभई थांबवू शकता.
  • तोंडात काहीतरी चघळत ठेवून जांभई कमी करू शकता, जेवणानंतर बडीशेप किंवा आवळा सुपारी खाल्ल्यास मुखशुद्धी व जांभई कमी होणे हे दोन्ही उपाय होऊ शकतात.
  • दात चावल्याने सुद्धा जांभई कमी होते.

Home Remedies For Low BP: कमी रक्तदाबाच्या समस्येवर दूध ठरेल रामबाण उपाय; सेवन करताना फक्त एवढं करा

itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…

दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जांभई येणे हा आजार नसला तरी आजाराचे लक्षण असू शकते. शरीराचे तापमान कमी होणे, मेंदू व शरीराला
ऑक्सिजन मिळत नसल्यास कार्यक्षमता कमी होणे, लिव्हर निकामी होणे व हृदय विकार याचेही जांभया लक्षण असू शकते. त्यामुळे तुम्हाला थकवा नसतानाही सतत जांभया येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.